IND vs ENG Test Series 2021: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूची मालिकेतून माघार; टी-20, वनडे बाबतीतही सस्पेन्स
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG Test Series 2021: इंग्लंडचा संघ भारतीय दौर्‍यावर (England Tour of India) येणार आहे जिथे दोन्ही संघात पहिले चार सामन्यांची टेस्ट सिरीज, त्यानंतर पाच टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरु होईल आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) जागा देण्यात आलेली नाही, परंतु वृत्तानुसार स्टार अष्टपैलू संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. या कसोटी मालिकेद्वारे तो पूर्णपणे तंदुरुस्त असण्याची शक्यता नाही आणि यामुळे तो कोणताही कसोटी सामना खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी टेस्ट दरम्यान जडेजा दुखापतग्रस्त (Jadeja Injury) झाला होता आणि त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. गुरुवारी सकाळीही जडेजा संपूर्ण टीमसह भारतात (India) पोहचला आणि त्यानंतर त्याला पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले जाईल. जडेजाला दौऱ्यावर टी-20 सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंग इंज्युरी देखील झाली होती. (India vs England Test Series: भारतीय संघाची घोषणा; कोहली, इशांत आणि हार्दिक पांड्या खेळणार तर पृथ्वी शॉ संघातून बाहेर)

जडेजाने दुसर्‍या मेलबर्न टेस्ट सामन्यात कमबॅक केलं आणि भारतीय संघाच्या विजयात त्याने मोठी भूमिकाही बजावली होती. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी विराट कोहली संघात परतला आहे, तर अक्षर पटेलचा पहिल्यांदा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेत जडेजाच्या खेळण्यावरही सस्पेन्स बनलेलं आहे. या संदर्भात भारतीय बोर्डाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु जशी परिस्थिती समोर आली आहे, तसे जाडेजाचे कमबॅक लांबणीवर जाताना दिसत आहे. जडेजाची जागा घेण्यासाठी अक्षर पटेलसह वॉशिंग्टन सुंदर यांच्यात एकाच स्थानासाठी स्पर्धा दिसत आहे. पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथे तर पुढील दोन कसोटी सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, जडेजाच्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात खेळण्यावर निर्णय नंतर घेण्यात येईल.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा ( विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.