India National Cricket Team vs England National Cricket Team, T20I Series 2024: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होईल. या दौऱ्यात प्रथम टी-20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी इंग्लंडने 22 डिसेंबर रोजी आपला संघ जाहीर केला आहे. जोस बटलरला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. पण भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.
हेड टू हेड रेकॉर्ड
आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये अटीतटीचे सामने पहायला मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 24 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने यात 13 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंड संघाने 11 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये सर्वाधिक धावसंख्या 224 धावांची आहे. जी टीम इंडियाने 2021 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर केली होती. सर्वात कमी संघ धावसंख्या 165 धावा आहे.
इंग्लंडचा संघही ताकदीचा
इंग्लंड संघाने जिंकलेल्या 11 सामन्यांपैकी 5 सामने घरच्या मैदानावर जिंकले आहेत. 5 सामने भारतीय भूमीवर जिंकले आहेत. तर टीम इंडीयाने 13 सामने जिंकल्याने फक्त काही सामन्यांचा फरक आहे. या मालिकेत 5 सामने खेळवले जातील, ज्यामध्ये हा फरक मोठ्या प्रमाणात बदलण्याची क्षमता आहे.
इंग्लंडचा संघ
इंग्लंडचा टी-20 संघ - जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेकब बिथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कार्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद.
इंग्लंडचा एकदिवसीय संघ - जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, जेकब बिथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कारसे, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद.