IND vs ENG Series 2021: विराट कोहलीला सर्वाधिक वेळा नडला इंग्लंडचा हा गोलंदाज, किंग कोहलीला पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी मैदानावर उतरणार
विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG Series 2021: ऑस्ट्रेलिया संघाच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे गेलेल्या टीम इंडियाला (Team India) टक्कर देण्यासाठी आता इंग्लंड संघ (England Team) भारतात येणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा भारतीय संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. टेस्ट सिरीजने दौऱ्याची सुरुवात होईल. 5 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पहिला सामना खेळला जाईल. घरच्या मैदानावर कसोटी सामना खेळणारा भारतीय संघ आपली विजयी लय कायम ठेवू पाहत असेल, पण कोहलीसाठी मात्र आव्हान खडतर असेल. कोहली सध्या जगातील प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे. कोहलीला बाद करणे फार कठीण असते मात्र असे काही गोलंदाज आहे ज्यांच्याविरुद्ध विराटला संघर्ष करावा लागला आहे. आणि टेस्टमध्ये इंग्लंडसाठी 600 विकेट घेणारा जेम्स अँडरसन (James Anderson) कोहलीला सर्वाधिक वेळा नाडला आहे. अँडरसनने कोहलीला कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये खरपूर त्रास दिला आहे. अशा स्थिती तो पुन्हा एकदा कोहलीला तंबूचा रास्ता दाखवण्यासाठी उत्सुक असेल. (IND vs ENG Test Series 2021: भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर)

कोहली आणि अँडरसन आजवर एकूण 17 कसोटी सामन्यात आमने-सामने आले आहेत ज्यात इंग्लंड गोलंदाजाने वर्चस्व गाजवले आहे. विराटविरुद्ध अँडरसनची सरासरी 31.38 अशी आहे. अँडरसन आणि विराट कोहली यांनी एकमेकांविरुद्ध 17 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 वेळा विराटला अँडरसनने बाद केले. यापैकी 4 वेळा अँडरसनने 2014 च्या मालिकेतच भारतीय फलंदाजाला बाद केले होते. कसोटी क्रिकेटमधेही विराट अँडरसन फेल झाला आहे. विराटने 43.86 च्या स्ट्राइक रेटने फक्त 225 धावा केल्या आहेत. शिवाय, अँडरसनने 12 वनडे सामन्यात विराटला 3 वेळा बाद केले आहे. अँडरसनविरुद्ध विराटने वनडे सामन्यात केवळ 26 धावा केल्या आहेत. 2011 मध्ये ओव्हलमध्ये कोहलीला प्रथम अँडरसनने बाद केले होते. इंग्लंडच्या या सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाजाविरुद्ध सतत अपयशाला विराट यंदा मागे टाकून मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल.

भारत आणि इंग्लंड संघात 4 सामन्यांची टेस्ट सिरीज, 5 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान क्रिकेट चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळेल. कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई तर अंतिम दोन अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळले जाईल. पैकी तिसरा सामना पिंक-बॉलने खेळला जाईल.