विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 5th T20I 2021: अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध (England) पाचव्या टी-20 सामन्यासाठी भारत नवीन सलामी जोडीसह मैदानात आणि ज्याने क्रिकेट चाहत्यांना भुरळ पडली. इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनने मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताला फलंदाजी करण्यात सांगितल्यावर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) उपकर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) नवीन सलामी जोडी बनवत स्वत:ची दुसऱ्या स्थानावर पदोन्नती दिली. रोहित शर्माने आक्रमकांची भूमिका घेतली आणि विराट कोहली बॅकफूटवर त्याला साथ देताना दिसला. दोघांनी 9 ओव्हरमध्ये 94 धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी काही विस्मयकारक शॉट्स खेळले आणि इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितने 34 चेंडूत 64 धावा केल्या तर विराट 80 धावा करून नाबाद परतला. यादरम्यान, दौऱ्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघावर टीका करणारे इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉनने (Michael Vaughan) विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या सलामीच्या जोडीची तुलना सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) भारताच्या दिग्गज सलामीच्या जोडीशी केली. (IND vs ENG 5th T20I 2021: हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम, ‘या’ टी-20 यादीत विराट कोहलीनंतर पटकावले दुसरे स्थान)

वॉन म्हणाले की टी-20 मध्ये भारतासाठी डावाची सुरुवात केल्यास हे दोन्ही फलंदाज माजी क्रिकेटपटूंच्या जोडीची बरोबरी करू शकतात. "विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा डोळ्यांसाठी चांगला ओपनिंग कॉम्बो असू शकत नाही!!! वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरशी सहज बरोबरी जर ते या जोडीसह टिकून राहिले," वॉनने ट्विटरवर लिहिले. इतकंच नाही तर यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत ते रोहित आणि कोहलीसह भारत खेळेल की काय असा प्रश्नही अनेकांना पडला. उल्लेखनीय म्हणजे, भारताने सध्या सुरू असलेल्या मालिकेत तब्बल 4 सलामी जोड्या मैदानात उतरवल्या आणि केएल राहुल, ईशान किशन व विराट आता या यादीत सामील झाले आहेत.

दरम्यान, टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने इंग्लिश टीमला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले आहे. यजमान संघाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली तसेच हिटमॅन रोहितने 34 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह अफलातून 64 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने 39 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 32 धावांचे योगदान दिले. रोहितने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 4 चौकार खेचले. रोहितने मार्टिन गप्टिलच्या 2839 धावांना देखील मागे टाकले 2864 धावांसह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.