IND vs ENG 4th Test Day 4: चौथ्या दिवसाच्या खेळापूर्वी KL Rahul ला धक्का; ICC ने जोरदार कारवाई केली, ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड
केएल राहुल व जो रूट (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 4th Test Day 4: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल (The Oval) मैदानावर खेळला जात आहे. तीन दिवसाच्या खेळानंतर भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. मात्र, चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाचा  (Indian Team) सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) आयसीसीकडून (ICC) धक्का बसला आहे. आयसीसीने राहुलवर आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करत राहुलला त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. याशिवाय राहुलला अनुशासनहीनतेसाठी एक डिमेरिट मार्क गुणही  देण्यात आला. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात फलंदाजीला येत जिमी अँडरसनच्या (James Anderson) चेंडूवर बाद होण्यापूर्वी राहुलने संयमी 46 धावा ठोकल्या. राहुलला विकेट्सच्या मागे झेलबादसाठ इंग्लंडने अपील केले पण सुरुवातीच्या नाबाद निर्णयानंतर, इंग्लिश खेळाडूंनी घेतलेल्या रिव्यूनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला, रिप्लेमध्ये बॅटच्या कडेला चेंडू लागलेला दाखवण्यात आला. ओव्हलवर तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ही घटना घडली. (IND vs ENG 4th Test: केएल राहुलला आउट देण्यावरून सुरू झाला वाद, यूजर्सने थर्ड अंपायरवर उपस्थित केले प्रश्न)

राहुलने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.8 चे उल्लंघन केल्याचे आढळले. हे खेळाडूंच्या सहाय्यक कार्मिकाने "आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शविणे" संबंधित आहे. राहुलच्या शिस्तप्रिय रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडला जाईल कारण 24 महिन्यांच्या कालावधीत हा त्याचा पहिला गुन्हा होता. मैदानावरील पंच अॅलेक्स वार्फ आणि रिचर्ड इलिंगवर्थ, थर्ड अंपायर माइकल गफ आणि मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी हा निर्णय घेतला. तसलेच राहुलने देखील अधिकाऱ्यांनी लावलेले आरोप स्वीकारले आणि म्हणून औपचारिक सुनावणीची गरज नव्हती. शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध चौथ्या भारताने ताबा मिळवला आहे आणि तिसऱ्या दिवशी स्टंपवर त्यांची आघाडी 171 पर्यंत वाढवली, भारताकडून रोहित शर्माने परदेशातील पहिले आणि आठवे कसोटी शतक झळकावले. तिसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा भारताने 270-3 धावांपर्यंत मजल मारली होती.

तत्पूर्वी, रोहित आणि चेतेश्वर पुजाराच्या जोडीने इंग्लंड गोलंदाजांना संघर्ष करायला लावला. दोंघांनी दुसऱ्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली ज्यामुळे वेगवान गोलंदाजांची अनुकूल खेळपट्टीवर धावा करणे सोपे आहे हे दाखवून दिले. रोहितने सर्वाधिक 127 धावा ठोकल्या तर पुजाराने 61 धावांचे योगदान दिले. पहिल्या दिवशी यजमानांनी भारताचा पहिला डाव 191 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंडने ओली पोपच्या सर्वाधिक 81 धावांच्या जोरावर 290 धावांवर मजल मारली.