IND vs ENG 3rd Test 2021: एकही वर्ल्ड कप सामना न खेळता 100 टेस्ट खेळणारा Ishant Sharma पाचवा क्रिकेटर, यादीत ‘या’ भारतीयचा देखील समावेश
इशांत शर्मा विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

Ishant Sharma 100th Test: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील तिसर्‍या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात मैदानावर उतरताच टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे. 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात टेस्ट डेब्यू करणारा शर्मा भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणारा 11 वा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, भारतासाठी कसोटी सामन्यांचे शतक करणारा इशांत फक्त दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. शिवाय, टीम इंडियाचा हा 'लंबू' गोलंदाज एकही वर्ल्ड कप सामना खेळलेला नाही. त्यामुळे, त्याने एका विशेष क्रिकेटपटूंच्या यंदाची पाचवे स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही कसोटी सामना न खेळता टेस्ट सामन्यांची शंभरी पूर्ण करणारा इशांत जगातील पाचवा क्रिकेटर ठरला आहे. यामध्ये भारताचा आणखी एक दिग्गज फलंदाजाचाही समावेश आहे. (IND vs ENG 3rd Test 2021: डे-नाईट टेस्टमध्ये इशांत शर्माचा कमाल, 100 वा कसोटी सामना खेळणारा ठरला 11वा भारतीय क्रिकेटर, पहा संपूर्ण लिस्ट)

2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करूनही इशांतला 2011, 2015 आणि 2019 वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आले. इशांतपूर्वी या यादीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही मोठ्या नावाचाही समावेश आहे ज्यात आणखी एक भारतीय म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध इडन गार्डनवर कसोटी विजयाचा नायक ठरलेला व्हीव्हीस लक्ष्मण. लक्ष्मणनेने सहा वनडे शतकांपैकी चार शतके46.18 च्या सरासरीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकली. तथापि, वर्ल्ड कपमध्ये भारताकडून त्याला खेळण्याची त्याची संधी कधीच मिळाली नाही. शिवाय, इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, माजी ऑस्ट्रेलियन जस्टीन लँगर, न्यूझीलंडचे कॉलिन कॅड्रे यांचाही समावेश आहे. कूकने 161 तर लँगरने 105 आणि कॅड्रेने 114 कसोटी सामने खेळले मात्र, त्यांना वर्ल्ड कपसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही.

दुसरीकडे, 100वा कसोटी सामना खेळत असला तरी संघाला विजय मिळवून देण्यावर इशांतचे लक्ष आहे.इशांतने सोमवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, “जर तुमची कारकीर्द 14 वर्षे लांब असेल आणि तुम्ही अद्याप खेळत असाल तर तुम्ही फक्त एका ठळक नावाचे नाव सांगू शकत नाही. फक्त एक ठळक मुद्दे सांगणे कठीण आहे, प्रत्येक खेळाडूचा आलेख वर-खाली जात असतो. माझा आलेख वर किंवा खाली आणलेल्या एका गोष्टीबद्दल मी म्हणू शकत नाही. अर्थात, 100 कसोटी खेळणे खूप चांगले वाटते, झहीर खानकडून मला बरेच काही शिकायला मिळाले, मी त्याच्या कामाच्या नैतिकतेतून शिकलो. मी संघात खेळणाऱ्या प्रत्येकाला सांगितले आहे की जर तुम्ही तुमच्या तंदुरुस्तीवर काम करत रहाल तर बक्षीस नक्कीच मिळेल.”