वीरेंद्र सेहवागने इंग्लंड टीमला केले ट्रोल (Photo Credit: Twitter, PTI)

IND vs ENG 3rd D/N Test: जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारताविरुद्ध (India) खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड (England) फलंदाजांनी टीम इंडियाच्या फिरकीसमोर अक्षरशः लोटांगण घातलं. टीम इंडियाचा (Team India) माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आपल्या मजेदार अंदाजात इंग्लिश संघाची स्थिती व्यक्त केली. भारताच्या अक्षर पटेल (Axar Patel) आणि रवीचंद्नन अश्विनच्या या फिरकी जोडीने इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर गुंडाळला व यजमान संघाला दणदणीत सुरुवात करून दिली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक 53 धावा केल्या तर लोकल बॉय अक्षरने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या, अश्विनने 3 फलंदाजांना माघारी धाडलं तर, इशांत शर्माला एक विकेट मिळाली. क्रॉलीने 84 चेंडूत 10 चौकारांसह 53 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. यादरम्यान, सेहवागने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जुना व्हिडिओ शेअर करत इंग्लिश टीमला ट्रोल केलं. (IND vs ENG 3rd Test 2021: एकही वर्ल्ड कप सामना न खेळता 100 टेस्ट खेळणारा Ishant Sharma पाचवा क्रिकेटर, यादीत ‘या’ भारतीयचा देखील समावेश)

दिवसाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये इशांत शर्माने डोम सिब्लीला शून्यावर मघादी धाडलं आणि यासह इंग्लंड संघाच्या विकेट पडण्याचे सत्र सुरु झाले. जॉनी बेअरस्टो देखील स्वस्तात परतला तर कर्णधार जो रूटला 17 धावांवर बाद करत अश्विनने संघाला मोठे यश मिळवून दिले. झॅक क्रॉलीने सर्वाधिक 53 धावांचा डाव खेळला. बेन स्टोक्स, ओली पोप, आणि बेन फिक्स अपयशी ठरल्याने संघाची स्थित अजून बिकट झाली. अश्विनने अक्षरला साथ देत पाहुण्या संघाला पहिल्या डावात 112 धावांवर आटोपलं. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी, 'खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया' असे म्हणताना ऐकू येत आहेत.  पहा राहुल गांधी यांचाही मजेदार व्हिडिओ:

दुसरीकडे, भारताकडून अक्षर पटेल आणि अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या फिरकी जोडीने एकूण नऊ गडी बाद केले. पटेलने 21.4 ओव्हरमध्ये 38 धावा देत जॅक क्रोली, जॉनी बेअरस्टो, उपकर्णधार बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन फोक्स यांचा शिकार केला. अश्विनने कर्णधार जो रूटसह ओली पोप आणि जॅक लीचला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. याशिवाय इशांत शर्माने संघासाठी आपल्या 100व्या सामन्यात सिब्लीच्या रूपात एक विकेट घेतली.