रिषभ पंत आणि जॅक लीच (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 3rd D/N Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंडविरुद्ध (England) सुरु असलेल्या टेस्ट सामन्यात देखील आपला जलवा कायम ठेवला आहे. पंतने या मालिकेत देखील आपल्या फलंदाजी आणि यष्टिरक्षनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुरुवार, 24 फेब्रुवारीपासून दोन्ही संघात अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा पिंक-बॉल टेस्ट सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पंतने पुन्हा विकेटकिपिंग ग्लोव्हस घालत विकेटच्या मागे आपले स्थान घेतले. यादरम्यान, पंतने असे काही केले ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंतच्या विकेटकिपिंगवर चाहत्यांसह दिग्गजांनी टीका केली होती परंतु, तो उत्कृष्ट कामगिरीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत आहे. शिवाय, चाहत्यांचे मनोरंजनही करत आहेत. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी विकेटच्या मागे अतिशय मजेशीर कृत्य केले. (IND vs ENG 3rd D/N Test: Ashwin याने पिंक-बॉल टेस्टमध्ये असा दूर केला जो रूटचा अडथळा, विराट कोहलीने तडफदार अंदाजात केलं सेलिब्रेट)

रविचंद्रन अश्विनने टाकलेल्या चेंडूवर इंग्लंडच्या जॅक लीचने (Jack Leach) शॉट मारला आणि धाव घेण्याचा विचार केला. इतक्यात विकेटच्या मागे असलेल्या पंतने आगळावेगळा आवाज काढला ज्यामुळे लीच गोंधळला आणि त्याने धाव घेण्यापासून माघार घेतली. पंतचा हा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंतचा आवाज ऐकून लीचने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला नाही. यावर माजी क्रिकेटपटू सेहवागनेही एक मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ पोस्ट करताना सेहवागने लिहिले की, "अल्टिमेट स्ट्रीट क्रिकेटर-रिषभ पंत. इतका आवाज करा की फलंदाज गोंधळून जाईल. हा व्हिडिओ पाहिल्यावर असा आवाज करून ते यष्टीरक्षक बनू शकले असते असे दुसरे कुणाला वाटते?" या व्हिडिओवर पंतनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि टिप्पणी विभागात 'हाहाहा लिहिले. हा व्हिडिओ ट्विटरवरही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून लोक त्यांचे खूप कौतुक करीत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag)

सामन्याबद्दल बोलायचे तर सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात 112 धावा केल्या. इंग्लिश टीमसाठी झॅक क्रॉलीने 84 चेंडूत 10 चौकारांसह सर्वाधिक 53 धावा केल्या. यजमान टीम इंडियासाठी अक्षर पटेलने वर्चस्व गाजवलं आणि 6 विकेट घेतल्या. त्यानंतर, फलंदाजी करताना दिवसाखेर 3 बाद 99 धावा केल्या.