IND vs ENG 3rd D/N Test: अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) आक्रमक सुरुवात केली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवत गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पहिल्या दिवसाच्या चहापानपर्यंत 4 विकेट गमावून 81 धावा केल्या आहेत. यामध्ये पाहुण्या संघाला सर्वात मोठा धक्का कर्णधार जो रूटच्या (Joe Root) रूपात बसला. इंग्लंडने पहिले फलंदाजी करताना पहिल्या 2 विकेट्स झटपट गमावल्यानंतर कर्णधार रुट आणि ओपनर जॅक क्रॉलीने डाव सावरला होता. दोघे अर्धशतकी भागीदारी करण्याच्या जवळ होते जेव्हा रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) भारताच्या मार्गातील रुटचा मोठा अडथळा दूर केला. अश्विनने रुटला 22व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पायचीत केलं. त्याने डीआरएसचा वापर केला होता पण, त्याचा ‘अंपायर्स डिसिजन’ असा निकाल अल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. रुट 37 चेंडूत 17 धावा करुन बाद झाला. (IND vs ENG 3rd Test Day 1: पिंक-बॉल टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांचा कहर; Tea पर्यंत इंग्लंड 4 बाद 81 धावा, झॅक क्रॉलीचे शानदार अर्धशतक)
यादरम्यान, रूट बाद झाल्यावर विराट कोहलीने (Virat Kohli) तडफदार अंदाजात सेलिब्रेट केलं. रूटची विकेट टीम इंडियासाठी नक्कीच महत्वाची होती. रूटने यापूर्वी, चेन्नई येथील पहिल्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती, ज्याचा फायदा इंग्लिश टीमला झाला आणि त्यांनी एकतर्फी सामना जिंकला. त्यामुळे, रूटची विकेट भारतीय संघासाठी गरजेची होती आणि कर्णधार कोहलीला हे कळून चुकले होते आणि इंग्लड कर्णधार बाद होताच विराटने आक्रमक अंदाजात सेलिब्रेट केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Aggressive Virat Kohli is a Treat To Watch 🔥
Punching The Ground ❤️😎pic.twitter.com/UVU1O0yJYw
— Virat Kohli Trends (@TrendingVirat) February 24, 2021
दुसरीकडे, टीम इंडिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ पहिल्यांदा पिंक-बॉल टेस्ट सामन्यात आमने-सामने आले आहेत. दोन्ही संघातील 4 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. सीरिजमधील पहिला सामना इंग्लडने तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने बरोबरी साधली. त्यामुळे, हा तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी या मालिकेच्या आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाचा आहे.