रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 3rd D/N Test: टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या सत्रापर्यंत बिनबाद 5 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी डिनरच्या वेळेपर्यंत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) ही सलामी जोडी मैदानात नाबाद खेळत आहेत. दरम्यान यापूर्वी, टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 112 धावांवर गुंडाळला. भारताकडून अक्षर पटेलने (Axar Patel) सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या तर अश्विनला 3 आणि इशांत शर्माला 1 विकेट मिळाली. इंग्लडकडून झॅक क्रॉलीने (Zak Crawley) सर्वाधिक धावा केल्या. क्रॉलीने 84 चेंडूत 10 चौकारांसह 53 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारताच्या फिरकी अक्षर आणि रविचंद्रन अश्विनने तो चुकीचा ठरवला. (IND vs ENG 3rd D/N Test: इंग्लंड आले आणि गेले! राहुल गांधींचा 'हा' व्हिडिओ शेअर करत Virender Sehwag ने अशी घेतली फिरकी)

क्रॉलीने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांना 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. पहिल्या सत्राखेरनंतरही इंग्लंड फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच डावाच्या 28व्या षटकात ऑली पोपला 1 आर अश्विनने त्रिफळाचीत केले, तर बेन स्टोक्सला (6) 29व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने पायचीत करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर, 35व्या ओव्हरयामध्ये अक्षरच्या चेंडूवर जोफ्रा आर्चर 11 धावांवर त्रिफळाचीत झाला. अश्विनने जॅक लीचला बाद करत इंग्लिश टीमच्या अडचणीत वाढ केली. पुढे अक्षरने 29 चेंडूत 3 धावा करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडला तर 49व्या ओव्हरमध्ये बेन फोक्सला 12 त्रिफळाचीत केले आणि इंग्लंडचा डाव स्वस्तात संपुष्टात आणला. जेम्स अँडरसन नाबाद परतला.

दरम्यान, भारत खेळला जाणारा हा दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. यापूर्वी, कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर पहिल्यांदा भारत आणि बांग्लादेश संघात गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळवण्यात आला होता. शिवाय, भारतीय संघाचा हा एकूण तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना ठरला. बांग्लादेशनंतर भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अ‍ॅडिलेड येथे देखील दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता, तर इंग्लंड संघाचा हा एकूण चौथा पिंक-बॉल टेस्ट सामना आहे.