IND vs ENG 3rd D/N Test Day 2 Live Streaming: भारत-इंग्लंड संघातील पिंक-बॉल टेस्ट कुठे, कधी आणि कसे पाहणार? जाणून घ्या LIVE Streaming व TV Telecast बाबत सर्वकाही
इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 3rd D/N Test Live Streaming: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात तिसऱ्या पिंक-बॉल टेस्टच्या (Pink-Ball Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा इंग्लंडचा निर्णय चुकीचा ठरला आणि पाहुण्या संघाचा पहिला डाव 112 धावांवर आटोपला. भारतीय फिरकीपटूंनी विशेषतः अक्षर पटेलने (Axar Patel) एकहाती वर्चस्व गाजवलं आणि इंग्लिश टीमला गुडघे टेकण्यास भाग पडले. आता दुसऱ्या दिवशी आता टीम इंडिया आता मोठी धावसंख्या करण्याच्या निर्धारित असेल तर इंग्लंड टीमला फक्त विकेटच सामन्यात पुनरागमन करून देऊ शकतात. दोन्ही संघातील तिसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर सामन्याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 3rd Test Day 1: भारतीय फिरकीपटूंनी मोडिली इंग्लंडची कंबर; दिवसाखेर टीम इंडियाच्या 3 बाद 99 धावा, रोहित शर्माचे शानदार अर्धशतक)

सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लिश फलंदाजांनी यजमान टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांपुढे लोटांगण घातलं. टीम इंडियाने पहिल्या दिवसावर वर्चस्व मिळवलं असून दिवसाखेर 3 विकेट्स गमावून 99 धावा केल्या.  रोहित शर्माने दिवसखेर भारताकडून सर्वाधिक नाबाद 57  धावा केल्या तर  शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या रुपात भारताने 3 विकेट् गमावल्या.  यापूर्वी, इंग्लंडकडून सलामी फलंदाज झॅक क्रॉलीने एकाकी लढा देत 53 धावांचा डाव खेळला. अन्य फलंदाज 20 धावसंख्याही पार करू शकले नाही. भारताकडून  अक्षर पटेलने सर्वाधिक 6 तर अनुभवी रविचंद्रन अश्विनने 3 फलंदाजांना माघारी धाडलं.

असा आहे भारत आणि इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.

इंग्लंड: जो रूट (कॅप्टन), झॅक क्रॉली, डोम सिब्ली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, ओली पोप, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, आणि जॅक लीच.