IND vs ENG 2nd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) दुसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना हाताला दुखापत झाल्याने भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) रविवारी इंग्लंडच्या पहिल्या डावात फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. पुजाराने 58 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. सकाळच्या सत्रात भारतीय संघ (Indian Team) 329 धावांवर बाद झाल्यानंतर पुजाराची बदली म्हणून सलामी फलंडनज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात आला. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) दिलेल्या निवेदनानुसार, ‘‘इंग्लंडविरुद्ध दुसर्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना चेतेश्वर पुजाराला उजव्या हाताला दुखापत झाली. नंतर त्याला वेदना होत असल्यामुळे तो आज मैदानात उतरणार नाही.’’ पुजाराने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, विशेषत: ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्या शरीरावर अनेक चेंडू घेतले पण तो क्रीजवरच राहिला आणि त्याने भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. (IND v ENG 2nd Test 2021: इंग्लंड संघाची कमाल! टीम इंडियाला दिली नाही एकही Extra धाव, मोडला तब्बल 66 वर्षे जुना वर्ल्ड रेकॉर्ड)
पुजाराला क्रीजवर फलंदाजी दरम्यान काळात काही वेदना जाणवल्या आणि बीसीसीआयने त्याला दुखावल्याची पुष्टी केली आहे मात्र, ”दुखापतीचे प्रमाण अद्याप स्पष्ट झालेले नाही.” पहिल्या दिवशी शुभमन गिल स्वस्तात बाद झाल्यावर पुजाराने सलामीवीर रोहित शर्मासह दुसर्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली मात्र, जॅक लिचने माघारी पाठवलं. दरम्यान, रोहित शर्माच्या शतकी खेळी आणि अजिंक्य रहाणे व रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 329 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या मूल्यवान विकेटसह आधीच चार ऑर्डर विकेट गमावल्या आहेत.
Cheteshwar Pujara was hit on his right hand while batting on Day 1 of the second @Paytm Test against England at Chepauk. He felt some pain later. He will not be fielding today. #INDvENG pic.twitter.com/k0KkFOiHVC
— BCCI (@BCCI) February 14, 2021
सलामी फलंदाज रोहित शर्माने पहिल्या दिवशी धमाकेदार दीडशतकी खेळी केली. रोहितने 231 चेंडूत 18 चौकार आणि 2 षटकारासह 161 धावा केल्या. दुसर्या दिवशी लंचपर्यंत एकूण 26 ओव्हरमध्ये एकूण 68 धावा झाल्या आणि 8 विकेट्स पडल्या. इंग्लंडने त्यात 4 गडी गमावून 39 धावा केल्या. तर टीम इंडियाने पहिल्या डावात 29 धावांवर 4 विकेट गमावल्या.