IND vs ENG 2nd Test Day 3 Live Streaming: चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर आज भारत (India) आणि इंग्लंड (England) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघातील सामना रंगतदार स्थितीत पोहचला असून टीम इंडियाने (Team India) सामन्यावर दबदबा कायम ठेवला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या यजमान भारतीय संघाने (Indian Team) सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर 249 धावांची आघाडी घेतली असून तिसऱ्या दिवशी इंग्लंडपुढे ते मोठी धावसंख्या करण्याच्या प्रयत्नात असतील. संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करत 1 विकेट गमावून 54 धावा केल्या आहेत, त्यामुळे तिसऱ्या दिवशी त्यांचे लक्ष जो रूटच्या पाहुण्या संघाला मोठे आव्हान देण्याचे असेल. भारत आणि इंग्लंड संघातील तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर सामन्याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 2nd Test Day 2: टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात 1 बाद 54 धावा, दिवसाखेर इंग्लंडविरुद्ध घेतली 249 धावांची आघाडी)
चेन्नई येथे दुसऱ्या सामन्यात पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने पहिल्या डावात 329 धावांचा डोंगर उभारला, मात्र पाहुण्या संघाची पहिल्या डावात अडखळत सुरुवात झाली ज्यामुळे ते अखेर 134 धावांपर्यंतच मजल मारू शकले. बेन फोक्स सर्वाधिक 42 धावा करून नाबाद परतला आणि ओली पोपने 22 धावा केल्या. अन्य कोणताही इंग्लिश फलंदाज 20 धावसंख्या पार करू शकला नाही. दुसरीकडे, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतच्या पहिल्या डावातील दमदार फलंदाजीनंतर आर अश्विनच्या नेतृत्वात गोलंदाजांनी विरोधी संघाच्या फलंदाजांवर सुरुवातीपासून दबाव कायम ठेवला आणि त्यांना मोठी धावसंख्या करू दिली नाही. अशाप्रकारे, यजमान टीमने 195 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली आणि दिवसाखेर 1 बाद 54 धावा केल्या.
असा आहे भारत आणि इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, केएल राहुल, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.
इंग्लंड: रोरी बर्न्स, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स, जो रूट (कॅप्टन), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, क्रिस वोक्स आणि ओली स्टोन.