विराट कोहली आणि आर अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test Day 2: चेपॉकवर (Chepauk) भारताविरुद्ध (India) दुसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत इंग्लंड (England) संघाचा संघर्ष सुरुच आहे. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर पाहुण्या संघाने 8 विकेट गमावून 106 धावा केल्या आहेत. टी-ब्रेकची घोषणा झाली तेव्हा बेन फोक्स 23 धावा करून खेळत होता. टीम इंडियाच्या (Team India) पहिल्या डावातील 329 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंड अद्याप 223 धावांनी पिछाडीवर आहे आणि पहिल्या डावात फॉलोऑन टाळण्यासाठी अद्याप 24 धावांची गरज आहे. लचंब्रेकपर्यंत 4 विकेट गमावणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या सत्रात सावध खेळी केली, मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांना नियमित अनंतरने आणखी चार  झटके दिले. इंग्लंडकडून पहिल्या डावात एकही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही. ओली पोपने 22, बेन स्टोक्सने (Ben Stokes) 18 धावा केल्या. डोम सिब्लीने 16 धावांचे योगदान दिले. भारताकडून रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) 3 विकेट घेतल्या. अक्षर पटेलला 2 तर मोहम्मद सिराज आणि इशांत शर्माला 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 2nd Test Day 2: Chepauk वर रविचंद्रन अश्विनचा सुपर शो, हरभजन सिंहला पछाडत भारतात सर्वाधिक टेस्ट विकेट घेणारा बनला दुसरा यशस्वी गोलंदाज)

दुसऱ्या सत्रात अश्विनने आक्रमक फलंदाज बेन स्टोक्सला 16 धावांवर आऊट करत इंग्लंडला 52 धावांवर पाचवा झटका दिला. यासह इंग्लंड संघाची बिकट स्थिती झाली. यानंतर, सिराजने ओली पोपला विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती 22 धावांवर कॅच आऊट केलं. भारतात पहिला सामना खेळणाऱ्या सिराजने 4 मेडन ओव्हर्स टाकल्या. त्यातही सिराजने एक विकेट घेण्याची कामगिरी केली. अक्षर पटेलने इंग्लंडला सातवा दणका देत मोईन अलीला 6 धावांवर अजिंक्य रहाणे हाती कॅच आऊट केलं. ओली स्टोनला रोहित शर्माच्या हाती कॅच आऊट करत अश्विनने डावात चार विकेट पूर्ण केल्या. यापूर्वी, पहिल्या सत्रात रोरी बर्न्स शून्यावर बाद झाला तर डोम सिब्ली 16 आणि जो रूट 6 धावा करून परतले व डॅन लॉरेन्सने 9 धावा केल्या. दुसर्‍या दिवशी भारताने 6 बाद300 धावांपासून खेळण्यास सुरवात केली.

दुसरीकडे, भारताच्या पहिल्या डावात सलामीवीर रोहित शर्माच्या पहिल्या दिवशी धमाकेदार दीडशतकी खेळीच्या आणि अजिंक्य रहाणे व रिषभ पंतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान टीम इंडियाचा दुसरा डाव 329 धावांवर संपुष्टात आला. रोहितने 231 चेंडूत 18 चौकार आणि 2 सिक्सह 161 धावा केल्या. रहाणेने 67 तर रिषभ पंतने नाबाद  58 धावांचे योगदान दिले.