विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Live Streaming: चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या टेस्ट सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी संघाने त्रिशतकी धावसंख्या गाठली आणि विरोधी संघावर दबाव निर्नाम केला. रोहित शर्माने (Rohit Sharma) धडाकेबाज दीडशतक ठोकलं तर, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. पण, रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) चांगली साथ दिली आणि भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली. जॅक लीच आणि मोईन अली यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. अशास्थितीत, दुसऱ्या दिवशी इंग्लंड चार शतकी धावसंख्येच्या आता गुंडाळण्याची प्रयत्नशील असतील. दुसरीकडे, टीम इंडिया मोठा स्कोर करू इच्छित असतील. भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर सामन्याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 2nd Test 2021: Rohit Sharma नव्वदीत असताना शतकी खेळी होईपर्यंत त्याची पत्नी Ritika ची भावमुद्रा कॅमेऱ्यात कैद, पहा Video)

चेपॉक स्टेडियमवर पहिल्या दिवशी टॉस जिंकून यजमान संघाने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, पण इंग्लिश गोलंदाजांनी शुभमन आणि कर्णधार कोहलीला शून्यावर बाद करत संघाला मोठा धक्का दिला. मात्र, रोहितने पहिले पुजारासोबत अर्धशतकी आणि नंतर रहाणेसोबत दीडशतकी भागीदारीने संघाला दोनशेपार मजल मारून दिली. यादरम्यान, ‘हिटमॅन’ने पहिल्यांदा एम. ए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्यांदा शंभरी धावसंख्या गाठली. दीडशतकी खेळी केल्यानंतर 231 चेंडूत 161 धावा काढून रोहित बाद झाला. आपल्या खेळीत रोहितने 18 चौकार आणि दोन षटकार लगावले. रोहित माघारी परतल्यानंतर भारताने नियमित अंतराने दोन विकेट गमावल्या. अजिंक्य रहाणे अर्धशतकी खेळी करून 67 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर, रविचंद्रन अश्विनदेखील 13 धावांवर तंबूत परतला. आता दुसऱ्या दिवशी रिषभ पंत आणि अक्षर पटेलच्या जोडीकडून मोठी धावसंख्या करण्याची जबाबदारी असेल.

असा आहे भारत आणि इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, केएल राहुल, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव,  जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.

इंग्लंड: रोरी बर्न्स, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स, जो रूट (कॅप्टन), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, क्रिस वोक्स आणि ओली स्टोन.