IND vs ENG 2021: इंग्लंडच्या भारत दौर्‍यावर दोन्ही संघांत रंगणार 5 टी-20, 4 टेस्ट सामने, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची घोषणा
विराट कोहली-जेम्स अँडरसन (Photo Credit: Facebook)

England Tour of India 2021: कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील रुळावर परतत आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) रवाना झाली आहे. या दौर्‍यानंतर टीम इंडिया (Team India) इंग्लंडचे (England) यजमानपद भूषविणार आहे. या दोघांमध्ये 4 कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मंगळवार, 24 नोव्हेंबर रोजी घोषणा केली. लिविंग गार्ड एजीने वर्चुअल पत्रकार परिषद आयोजित केली होती. या दरम्यान, बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष गांगुली म्हणाले की, फेब्रुवारी-ते मार्च महिन्यात इंग्लंड संघ चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा (England Tour of India) करेल. ते म्हणाले की, द्विपक्षीय मालिकेचे आयोजन करणे सोप्पे असते कारण त्यात फक्त दोन संघ असतात. "जेव्हा ते 8 संघ, 9 संघ, 10 संघ होतात तेव्हा ते थोडे अधिक कठीण होते... आम्हाला परिस्थितीचे परीक्षण करत राहावे लागेल ... त्यातील बरेच जण दुसर्‍या लाटेवर बोलत आहेत," ते म्हणाले. (India Tour of England 2021: टीम इंडिया टेस्ट मालिकेसाठी करणार इंग्लंडचा दौरा, ECB कडून वेळापत्रक घोषित)

दरम्यान भारत-इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 आणि तितकेच वनडे सामने यावर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार होते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते रद्द करण्यात आले. बोर्डाने पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता सुधारित वेळापत्रकात टी-20 ची संख्या वाढविण्यात आली आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर दोन्ही संघात पहिल्यांदा डे/नाईट कसोटी मालिकाही खेळली जाणार असल्याच यापूर्वी गांगुली यांनी म्हटलं होत जे अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जाईल असे म्हटले जात आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. कोलकाता येथे बांग्लादेशविरुद्ध भारताने पहिली डे-नाईट कसोटी टेस्ट खेळली.

ऑस्ट्रेलिया मालिकेवर बोलताना ते म्हणाले की 11 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचे आगमन झाले. त्यांचा 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण होत आहे आणि संघाने तेथे सराव सत्रात भाग घेणे सुरु केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची स्थिती फारशी गंभीर नसल्यामुळे तेथे क्रिकेटचे सामने आयोजित करणे सोपे होईल.