IND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी  सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा
जो रूट व विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Live Streaming: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुसऱ्या सत्राच्या पहिल्या सामन्यासाठी भारत (India) आणि इंग्लंड (England) संघ सज्ज आहे. जो रूटचा ब्रिटिश संघ व विराट कोहलीच्या टीम इंडिया (Team India) यांच्यातील पाच सामन्यांच्या पहिला सामना नॉटिंगहॅमच्या (Nottingham) ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाणार आहे. आणि सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघावर (Indian Team) असेल ज्यांना गेल्या दशकात इंग्लंडमध्ये खेळताना सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल तर टॉस अर्धातासपूर्वी दुपारी 3:00 वाजता होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण SonyLiv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो. (IND vs ENG 1st Test: ‘ही’ आहे इंग्लंडची दोन घातक शस्त्रे, ज्यांच्यापुढे दिग्गजांनीही टेकले आहेत गुडघे)

भारतीय कर्णधार विराट कोहलीने खेळाच्या काही दिवस आधी न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सामन्याच्या एक दिवसापूर्वीच अंतिम सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आणि अटींचा आदर न केल्याबद्दल टीका केली. पण इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने असे न करता टॉसपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. कोहली 2014 च्या संघाचा एक भाग होता जेव्हा संघाला 1-3 ने पराभव पत्करावा लागला होता आणि तत्कालीन उपकर्णधाराने बॅटने प्रभावी कामगिरी बजावत आली नव्हती. त्यानंतर तो 2018 मध्ये निर्धाराने ब्रिटन दौऱ्यावर परतला आणि त्याने मोठ्या संख्येने धावा केल्या परंतु संघाला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारतीय संघाने अखेर 2008 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

पाहा भारत-इंग्लंड कसोटी संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

इंग्लंड: जो रूट (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, मार्क वुड.