IND vs ENG 1st Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. चेन्नईच्या (Chennai) एम. ए चिदंबरम स्टेडियममध्ये आजपासू सुरु झालेल्या सामन्यात इंग्लंड संघाने पहिल्या दिवसाखेर बॅटने वर्चस्व गाजवले. इंग्लिश कर्णधार जो रूटने (Joe Root) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाने तीन विकेट गमावून पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 263 धावा केल्या. संघासाठीच्या 100व्या कसोटी सामन्यात कर्णधार जो रूटने 197 चेंडूत 128 चौकार आणि चार षटकारांसह 128 धावा ठोकल्या तर डॉम सिब्ली (Dom Sibley) 87 धावा करून माघारी परतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी बरेच मोठ्या रेकॉर्डची नोंद केली गेली जी खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 1st Test 2021: विराट कोहलीने पहिल्या दिवशी आपल्या या जेस्चरने जिंकली चाहत्यांची मनं, तुम्हीही कराल सलाम)
1. इंग्लंडचा कर्णधार रूट एमए चिदंबरम स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीचा 100 वा कसोटी सामना खेळत आहे. इंग्लंडकडून 100 कसोटी सामने खेळणारा रूट 15 वा खेळाडू आहे.
2. रूटने आज चेन्नईत 128 धावांची नाबाद शतकी खेळी केली. रूटच्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीचे हे 20वे शतक ठरले.
3. रूट 100वा कसोटी सामन्यात शतक झळकावणारा इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे तर एकूणच 9वा खेळाडू ठरला.
4. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चेन्नई येथे आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीचा 18वा सामना खेळत आहे. बुमराहचा भारतात हा पहिलाच सामना आहे. बुमराहने यापूर्वी 17 सामने विदेशात खेळले आहे. यासह त्याने आता परदेशात सर्वाधिक सामने खेळल्यानंतर घरी कसोटी खेळण्याचा विक्रमाची नोंद केली आहे. बुमराहच्या आधी जवागल श्रीनाथने भारतात टेस्ट पदार्पणानंतर परदेशात 12 कसोटी सामने खेळले होते.
5. डोम सिब्लीने आज आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले.
रोरी बर्न्स, डॅन लॉरेन्स आणि सिब्ली यांच्यारुपात इंग्लंडला तीन धक्के लागले. बर्न्स 60 चेंडूत 33 धावा करून अश्विनचा शिखर बनला तर सिब्ली आणि लॉरेन्स यांना जसप्रीत बुमराहने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. सिब्ली 286 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 87 धावा करुन बाद झाला तर लॉरेन्स खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.