IND vs ENG 1st Test: पहिली नॉटिंगहम कसोटी अनिर्णित; इंग्लंडविरुद्ध भारताच्या विजयात पाऊस बनला खलनायक
विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 1st Test 2021: भारत (India) आणि यजमान इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या नॉटिंगहम कसोटी (Nottingham Test) सामन्यात पावसाने खलनायकाची भूमिका बजावली. विराटसेना आणि जो रूटच्ये ब्रिटिश संघातील ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) येथे खेळण्यात आलेला पहिली कसोटी मॅच अनिर्णित झाली आहे. दोन्ही संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून यापैकी पहिला सामना ड्रॉ झाला तर आता पुढच्या दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ लंडनला प्रवास करतील. 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान दोन्ही संघातील पुढील सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात 303 धावा केल्या असून, टीम इंडियाला (Team India) विजयासाठी एकूण 209 धावांचे टार्गेट दिले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याच्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाने आघाडी मिळवली होती पण पावसाने त्यांच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले आहे. (IND vs ENG 1st Test: नॉटिंगहम कसोटीत जसप्रीत बुमराहची कमाल, दुसऱ्यांदा ट्रेंट ब्रिज ऑनर्स बोर्डवर दुसऱ्यांदा झळकले नाव; पहा Video)

इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 183 धावांवर संपुष्टात आला. ज्यानंतर भारताने पहिल्या डावात 278 धावा करून 95 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडसाठी कर्णधार जो रूटने दुसऱ्या डावात 109 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने चौथ्या दिवशी 52/1 धावांपर्यंत मजल मारली होती आणि पाचव्या दिवशी त्यांना विजयासाठी आणखी 157 धावांची आणखी गरज होती पण पावसाने सामना धुवून काढला ज्यामुळे आता दोन्ही संघातील पहिला सामना अनिर्णित राहिला. दरम्यान, ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी बजावली. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक हल्ल्यापुढे मात्तबर ब्रिटिश फलंदाज ढेर झाले आणि मोठ्या धावसंख्यापर्यंत मजल मारू शकले नाही.

यानंतर केएल राहुल आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 95 धावांची आघाडी घेतली ज्याचा फायदा त्यांना दुसऱ्या डावात झाला. दुसऱ्या डावात देखील इंग्लंड फलंदाजांच्या घसरगुंडी सुरूच राहिली तर रूटने एकटी झुंज देत 109 धावांची शतकी कामगिरी केली पण संघ मोठी आघाडी घेऊ शकला नाही. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेत यजमान संघाला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या गाठू दिली नाही. यामुळे भारताला विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य मिळाले.