IND vs ENG 1st Test: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघाच्या तगड्या खेळाडूंची फौज मैदानात; पाहा Playing XI
विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test: नॉटिंगहम (Nottingham) येथील भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील पहिल्या कसोटी सामन्यात ब्रिटिश कर्णधार जो रूटने (Joe Root) टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) समावेश केला आहे. भारतीय इलेव्हनमध्ये शार्दूल ठाकूरचा समावेश झाला आहे तसेच भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) व केएल राहुलची (KL Rahul) जोडी सलामीला उतरेल. इंग्लंडने डॉम बेसला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू दिला आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नवीन सायकलचा पहिला सामना आहे. या सामन्यासह, उपविजेत्या भारत आणि इंग्लंड संघाला त्यांच्या नवीन मोहिमेची सुरुवात करतील. (IND vs ENG 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा)

दोन्ही संघांना यापूर्वी झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. त्यामुळे मागील पराभव विसरून हे दोन्ही संघ पुन्हा नव्याने सुरुवात करण्याच्या निर्धारित असतील. दुसरीकडे, यजमान ब्रिटिश संघ भारताविरुद्ध हिशोब बरोबर करण्यासाठी मैदानात उतरेल. यंदा वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर ब्रिटिश संघाला कसोटी मालिकेत 3-1 ने पराभव पत्करावा लागला होता ज्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी पात्र ठरू शकले नाही. अशास्थतीत घरच्या मैदानावर खेळत इंग्लंड टीम परिस्थितीचा पुरेपूर फायदा करून घेऊ इच्छित असतील. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड, या वेगवान गोलंदाजांची जोडी पुन्हा एकदा संघाच्या गोलंदाजी हल्ल्याचे नेतृत्व करण्यासाठी उत्सुक असतील. अँडरसन व ब्रॉडच्या जोडीने भारतीय फलंदाजांविरुद्ध आतापर्यंत जोरदार कामगिरी बजावली आहे. त्यामुळे यंदाही कॅप्टन रूट व संघाला त्याच्याकडून आक्रमक गोलंदाजीची अपेक्षा असेल.

पाहा प्लेइंग इलेव्हन

भारत प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: जो रूट (कॅप्टन), रोरी बर्न्स, डॉमिनिक सिब्ली, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, डॅन लॉरेन्स, जोस बटलर (विकेटकीपर), सॅम कुरन, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.