IND vs ENG 1st Test Day 5 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील पहिली टेस्ट कधी-कुठे कसे पाहता येणार? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast बद्दल सर्वकाही
विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 5 Live Streaming: भारत (India) आणि इंग्लड (England) संघातील पहिल्या चेन्नई कसोटी सामन्यात रंगतदार स्थती बनली आहे. आज सामन्याच्या पाचव्या आणि निर्णायक दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. टीम इंडियापुढे (Team India) 420 आव्हान असून अंतिम दिवशी त्यांना 381 धावांची गरज आहे. यापूर्वी इंग्लंडचा दुसरा डाव 178 धावांवर संपुष्टात आला, मात्र त्यांना दुसऱ्या डावात 241 धावांची आघाडी मिळाल्याने भारताला अखेरीस चारशेपार धावांचं तगडं लक्ष्य मिळालं. सामन्याच्या अंतिम निर्णायक दिवसाचा खेळ शिल्लक असताना दिवसाखेर कोणता संघ बाजी मारेल हे पाहणे उत्साहाचे ठरेल. आता दोन्ही संघातील पाचव्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:20 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर सामन्याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 1st Test Day 4: भारताच्या अचूक गोलंदाजीपुढे इंग्लडचे शेर आज ढेर; अश्विनने घेतल्या 6 विकेट्स, टीम इंडियाला 420 धावांचं तगडं टार्गेट)

चौथ्या दिवसाखेर भारतीय संघाला रोहित शर्माच्या रूपात पहिला धक्का बसला. रोहितच्या अपयशाचे सत्र दुसऱ्या डावातही सुरु राहिले. हिटमॅन यंदा फक्त 11 धावाच करू शकला आणि माघारी परतला. त्यामुळे, आता दिवसाखेर कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यावर भारतीय संघाच्या विजयाची मदार असेल. यापूर्वी, भारतीय गोलंदाजांनी कमाल कामगिरी करत इंग्लंडला मोठी आघाडी घेऊ दिली नव्हती त्यामुळे, गोलंदाजांनंतर फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. दोन्ही संघ आज विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील मात्र, कोणता संघ बाजी मारेल हे तर दिवसाखेरच समजेल.

असा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत,वॉशिंगटन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा.

इंग्लंड: जो रुट (कॅप्टन), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, डॉम बेस. जॅक लीचआणि जेम्स अँडरसन.