विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 1st Test Day 3 Live Streaming: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील कसोटी मालिकेच्या आज तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. कर्णधार जो रूटने (Joe Root) टीम इंडियाला (Team India) दणका देत शानदार द्विशतकी खेळी केली आणि संघाने दुसऱ्या दिवसाखेर 8 विकेट गमावून 500 धावसंख्येचा टप्पा ओलांडला. यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज इंग्लंडला ऑलआऊट करू इच्छित असतील. तर शिल्लक दोन फलंदाज संघाची धावसंख्या 600 पार नेण्याच्या प्रयत्नात असतील. डोम बेस (Dom Bess) आणि जॅक लीचची (Jack Leech) जोडी तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात करेल. भारत आणि इंग्लंड संघातील तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:20 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर मालिकेचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 1st Test Day 2: द्विशतकी Joe Root याचा चेन्नईत वर्ल्ड रेकॉर्ड, पहा सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड बनलेले हे प्रमुख रेकॉर्ड)

कर्णधार जो रूटच्या द्विशतकी खेळीने पहिल्या डावात टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. संघ अडचणीत असताना रूटने तिसऱ्या विकेटसाठी डॉम सिब्लीसह द्विशतकी आणि तिसऱ्या विकेटसाठी बेन स्टोक्ससह केलेल्या शतकी भागीदारीने संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली आहे. रूटने पुढाकार घेत बॅटने नेतृत्व केले आणि सर्वाधिक 218 धावा केल्या तर सिब्लीने 87 आणि स्टोक्सने 80 धावांची खेळी करत रूटला चांगली साथ दिली.भारताच्या फिरकी गोलंदाजीविरुद्ध इंग्लंड फलंदाजांनी संयमी खेळी केली आणि हल्लाबोल केला. शाहबाझ नदीमने सर्वाधिक 167 तर रविचंद्रन अश्विनने 132 धावा लुटवल्या. वॉशिंग्टन सुंदरने 98 धावा दिल्या आणि त्याला अद्याप एकही विकेट मिळाली नाही.

असा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत,वॉशिंगटन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा.

इंग्लंड: जो रुट (कॅप्टन), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, डॉम बेस. जॅक लीचआणि जेम्स अँडरसन.