IND vs ENG 1st Test Day 2: नॉटिंगहमच्या (Nottingham) ट्रेंट ब्रिज येथे भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे बिघडला. दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ झाल्यावर अखेरच्या दोन्ही सत्रात पावसाने एंट्री मारली ज्यामुळे वेळेपूर्वी सामना संपवण्यात आला. अंधूक प्रकाश आणि पावसामुळे खेळ थांबेपर्यंत भारताने 4 बाद 125 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे भारतीय संघ (Indian Team) अद्यापही इंग्लंडच्या 58 धावांनी पिछाडीवर आहेत. भारताकडून केएल राहुल (KL Rahul) 57 आणि रिषभ पंत 7 धावा करून खेळत होते. पहिला दिवस टीम इंडियाने (Team India) गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपला दम दाखवला. (IND vs ENG 1st Test 2021: ‘गोल्डन डक’ वर बाद होताच ‘कर्णधार’ Virat Kohli याच्या नावे जमा झाला ‘हा’ नकोसा विक्रम, टीम इंडिया कॅप्टनविरुद्ध अँडरसनचा बोलबाला)
दिवसाच्या पहिल्या सत्रात 97/1 धावांपर्यंत मजल मारलेल्या टीम इंडियाची स्थिती दिवसाखेर 125/5 अशी झाली. रोहित शर्मापाठोपाठ संघाचे आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे स्वस्तात तंबूत परतले. दुसरीकडे, यजमान संघासाठी जेम्स अँडरसनने 2 तर ओली रॉबिन्सनने 1 विकेट काढली. दुसऱ्या दिवशी भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्माची सलामी जोडी मैदानात उतरली. इंग्लंड संघाला विकेट्सची अत्यंत गरज असताना दोन्ही सलामीवीर मैदानावर ठाण मारलं. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. राहुल आणि रोहित तळ ठोकून उभे असताना लंचपूर्वी रॉबिनसनने सॅम कुरनकडे रोहितला 36 धावांवर तंबूत धाडलं. दोघांमध्ये 97 धावांची भागीदारी झाली.
UPDATE: Play on Day 2 has been abandoned at Trent Bridge! #TeamIndia will resume Day 3 at 125/4. #ENGvIND
Scorecard 👉 https://t.co/TrX6JMzP9A pic.twitter.com/B4bgedz84S
— BCCI (@BCCI) August 5, 2021
त्यानंतर इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने आपली जादू कायम राखत एकाच ओव्हरमध्ये भारताच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पुजारा 4 धावांवर तर कर्णधार कोहली शून्यावर परतला. यादरम्यान, राहुलने 128 चेंडूत कारकिर्दीतील 12 वे अर्धशतक ठोकलं. तसेच चोरटी धाव घेण्याच्या नादात अजिंक्य रहाणे 5 धावांवर तंबूत परतला. दुसरीकडे, पहिल्या दिवशी यजमान ब्रिटिश संघाने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे संघ 183 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. कर्णधार जो रूटने एकाकी झुंज देत सर्वाधिक 64 धावा काढल्या असताना अन्य फलंदाज तीस धावसंख्येपुढे पोहचू शकले नाही.