वॉशिंग्टन सुंदर (Photo Credit: Twitter)

IND vs County XI Tour Match: डरहम (Durham) येथे भारताविरुद्ध (India) काउंटी इलेव्हन (County Select XI) संघाकडून सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुखापत झाली असूनही अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) मैदानात उतरल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना गोंधळ उडाला. बुधवारी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना सुंदरच्या बोटाला दुखापत झाली होती आणि आता तो इंग्लंडविरुद्ध (England) 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला असल्याचे वृत्त समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुंदर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेला मुकणार असून मायदेशी परतणार आहे. तथापि, काउंटी इलेव्हनच्या मैदानावर सुंदरला क्षेत्ररक्षण करताना पाहून ट्विटरवर असलेल्या चाहत्यांना धक्का बसला ज्यांनी दुखापत असूनही अष्टपैलू खेळाडूला मैदानात का पाठवले गेले असा प्रश्न उपस्थित केला. (IND vs ENG Series 2021: टीम इंडियाला डबल दणका, आवेश खान पाठोपाठ ‘हा’ अष्टपैलू खेळाडूही इंग्लंड दौऱ्यातून आऊट)

भारताच्या दुसऱ्या डावात सुंदरने ब्रिटिश गोलंदाज जॅक कार्सनच्या गोलंदाजीवर भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालचा झेल पकडला तेव्हा तो नेटकऱ्यांच्या नजरेत आला. दुखापत असूनही काउंटी इलेव्हनच्या भारतविरुद्ध सराव सामन्यात सुंदरला मैदानावर उतरलेले पाहून नेटकऱ्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या.

काउंटी इलेव्हनसाठी सुंदरची फील्डिंग...

तुटलेल्या बोटाने कॅच घेतला!

सुंदर फील्डिंग करत आहे?

सुंदर अजूनही मैदानात का आहे?

तीन दिवसांच्या सराव सामन्याच्या 3 व्या दिवशी सुंदर काउंटी इलेव्हनकडून मिडऑनवर मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसला. अहवालानुसार अष्टपैलू खेळाडू घरी परतणार आहे आणि त्याच्या दुखापतीचे प्रमाण अद्याप समजू शकलेले नाही. सलामी फलंदाज शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज आवेश खान संबंधित दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर सुंदर इंग्लंडचा आगामी कसोटी सामना गमावणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. आवेशही भारत विरुद्ध सुरू असलेल्या सराव सामन्यात काउंटी इलेव्हनकडून खेळत होता आणि त्याच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याच्या डाव्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाला आणि नेट्समध्ये बॉलिंग करण्याची शक्यता कमी आहे.