टी-20 विश्वचषकात (T20 WC 2022) भारताचा पहिला पराभव दक्षिण आफ्रिकेकडून (IND vs SA) झाला. रविवारी दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 5 गडी राखून पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भारताचे आता ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने बाकी असून भारताला उपांत्य फेरीत (Semi Final) सहज प्रवेश करायचा असेल तर हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. पण हवामान पाहता भारताचा उपांत्य फेरीचा रस्ता सोपा होणार नाही, असे दिसते. वास्तविक, टीम इंडियाला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध अॅडलेडमध्ये खेळायचा आहे आणि या सामन्यात पावसाचे सावट आहे.
सामन्यावर पावसाचे सावट
टी-20 विश्वचषकात भारताचा सामना बुधवारी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. अहवालानुसार, भारताच्या सामन्याच्या दिवशी अॅडलेडमध्ये पावसाची 60% ते 70% शक्यता आहे, तर मैदान दिवसभर काळ्या ढगांनी झाकलेले असेल. त्याच वेळी, वर्ल्डवेदरऑनलाइनच्या अहवालानुसार, संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु रात्री आणखी पाऊस पडू शकतो. स्थानिक वेळेनुसार भारताचा हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. (हे देखील वाचा: 'इंडियाने मरवा दिया' टीम इंडियाच्या हार नंतर शोएब अख्तर झाला दुखी, व्हिडीओ शेअर करुन दिली प्रतिक्रिया)
भारत कसा पोहचु शकतो उपांत्य फेरीत?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचे भवितव्य आता त्याच्या हातात आहे. मात्र, रोहित शर्माचा संघ याला आता हलक्यात घेऊ शकत नाही. भारताला आता सुपर 12 च्या ग्रुप-2 मधील त्यांचे दोन उर्वरित सामने बांगलादेशविरुद्ध 2 नोव्हेंबरला आणि 5 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे आहेत. भारत दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. सुपर 12 च्या गट 2 चे मोठे चित्र असे आहे की ग्रुप 2 च्या गुणतालिकेत भारताला अव्वल स्थान मिळविण्यासाठी, दक्षिण आफ्रिकेला पुढील सामन्यांमध्ये पाकिस्तान किंवा नेदरलँड्सपैकी एकाकडून पराभूत होणे महत्वाचे आहे. आणि भारताला त्याचे दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.