'किंग' कोहली याचे रेकॉर्ड शतक, बांग्लादेशविरुद्ध  डे-नाईट मॅचमध्ये भारतीय संघाने टेस्ट क्रिकेटमध्ये केली 'या' विश्वविक्रमांची नोंद, वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघ (Photo Credits: Twitter)

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध डाव आणि धावांनी पराभूत करत भारतीय संघाने (Indian Team) कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. दोन्ही संघात खेळण्यात आलेल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात भारताने बांग्लादेशचा डाव आणि 46 धावांनी पराभव केला. यासह भारताने दोन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आणि बांग्लादेशचा क्लीन-स्वीप केला. दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदा गुंलाबी चेंडूने टेस्ट (Pink Ball Test) सामना खेळण्यात आला होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सतत नवीन विक्रमांची नोंद करत असतो आणि दोन्ही संघातील हा सामना खरोखर ऐतिहासिक ठरला. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि उमेश यादव (Umesh Yadav) यांनी महत्वाची योगदान दिले. विराटने फलंदाजी करत 136 धावांची शानदार खेळी केली, तर इशांतने पहिल्या आणि उमेशने पाच विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला. (IND vs BAN 2nd Pink Ball Test: ऐतिहासिक डे-नाईट मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय, बांग्लादेशवर डाव आणि 46 धावांनी विजय मिळवत मालिकेत केला क्लीन-स्वीप)

भारतात खेळताना टीम इंडियाचा हा सलग 12 वा कसोटी मालिका विजय आहे. या प्रकरणातही भारतीय संघाने विश्वविक्रम केला आहे. भारताच्या या ऐतिहासिक टेस्ट सामन्यात भारतीय सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली. पाहा:

सलग 7 वा कसोटी विजय

विराट कोहलीच्या नेतृत्वात, या ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरूद्धअँटिगामध्ये कसोटी मालिका जिंकल्यापासून भारताचा सलग 7 वा कसोटी विजय आहे. यासह विराटने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला पिछाडीवर टाकले आहे. 2013 फेब्रुवारी-नोव्हेंबरमध्ये धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग 6 मालिका जिंकली होती.

रिकी पॉन्टिंगची बरोबरी

बांग्लादेशविरुद्ध गुलाबी बॉल टेस्ट सामन्यात विराटने शनिवारी दुसर्‍या दिवशी शतक केले आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याची बरोबरी केली. बांग्लादेशविरुद्धचे हे शतक विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील70 वे, तर कसोटीतील त्याचे 27 वे शतक आहे. या शतकासह कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांची जोड देऊन सर्वाधिक 41 शतक ठोकणार्‍या विराटने पोंटिंगची बरोबरी केली.

रिकी पॉन्टिंगला टाकले पिछाडीवर

भारतीय कर्णधार म्हणून विराटचे कसोटीतील हे 20 वे शतक आहे, या प्रकरणात त्याने कर्णधार म्हणून 19 शतके ठोकलेल्या पॉन्टिंगला मागे टाकले. याबाबतीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ याने कर्णधार म्हणून सर्वाधिक 25 शतकं केली आहे.

डावाच्या फरकाने सलग चौथा कसोटी विजय

डावाच्या फरकाने सलग चार कसोटी सामन्यात विजय मिळवणारा भारत पहिला संघ ठरला. ऐतिहासिक गुलाबी बॉल कसोटी सामन्यात भारताने बांग्लादेशचा डाव आणि 46 धावांनी पराभव केला. यापूर्वी, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पुणे टेस्ट सामन्यात डाव आणि 137, रांची टेस्ट सामन्यात डाव आणि 202, आणि बांग्लादेशविरुद्ध इंदोरमध्ये डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता.

घरच्या मैदानावरील सलग 11 वा विजय

कोलकाता सामन्यातील विजयासह विराट कोहलीने आता घरच्या मैदानावर खेळताना सलग11वी मालिका जिंकण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे.

एलन बॉर्डर राहिले मागे

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एलन बॉर्डर यांच्या 32 कसोटी विजयांच्या रेकॉर्ड कोहलीने मोडला आणि आतापर्यंत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराटने कर्णधार म्हणून 33 कसोटी सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ 109 सामन्यांपैकी 53 विजयांसह अव्वल स्थानी आहे.

सर्वात जलद 70 आंतरराष्ट्रीय शतक

वेगवान 70 आंतरराष्ट्रीय शतक करण्याच्या बाबतीत कोहलीने सचिन तेंडुलकर याला मागे टाकले आहे. कोहलीने 439 डावात हा आकडा गाठला, तर पॉन्टिंगने 649 डाव आणि सचिनने 505 डाव घेतले होते.

सर्वात जलद 5,000 धावा

कोहलीने बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात 32 धावा केल्याबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 5000 धावा पूर्ण केल्या. कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात 86 व्या डावात 5000 धावा पूर्ण केल्या. यासह विराटने रिकी पाँटिंगला मागे सोडले, ज्याने कर्णधार म्हणून हे कामगिरी आपल्या 97 व्या डावात केली होती.

पिंक-बॉलने शतक करणारा पहिला भारतीय

'रन मशीन' विराटने बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाच्य विजयात महत्वाची भूमिका बजावली. विराटने बांग्लादेशविरुद्ध 136 धावांची खेळी केली आणि भारतासाठी पिंक बॉल टेस्ट सामन्यात शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

विराट कोहली-अजिंक्य रहाणेची रेकॉर्ड भागीदारी

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी मिळून टेस्ट क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या डे-नाईट टेस्ट मॅचच्या दुसर्‍या दिवशी चौथ्या विकेटसाठी दोघांनी 99 धावांची भागीदारी केली. यासह, दोघांनी कसोटीमध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक सर्वाधिक धावा करणारी दुसरी जोडी बनली आहे. या दोघांनीही 42 डावांमध्ये 2763 धावा केल्या आहेत. (IND vs BAN 2nd Pink Ball Test: विराट कोहली-अजिंक्य रहाणे यांच्या जोडीची कमाल, सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर यांना मागे टाकत बनले नंबर 1)

पुजाराचा कमाल

कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्समधील दोन सामन्यांच्या मालिकेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने 55 धावा केल्या आणि 12 वे धावा पूर्ण करत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 15,000 धावा पूर्ण केल्या. हे कामगिरी करणारा पुजारा तिसरा भारतीय आहे. याशिवाय बांग्लादेशविरुद्ध दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी फिल्डिंग करताना त्याने आपल्या 50कॅच पूर्ण केले.

भारताने बांग्लादेशचा डाव आणि 46 धावांनी पराभव करून मालिका 2-0 अशी जिंकली. यासह बांग्लादेश संघाला पुन्हा एकदा कसोटी मालिकेत भारताविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. बांग्लादेशच्या मुशफिकुर रहीम याने जोरदार झुंज दिली, पण संघाचा पराभव टाळू शकला नाही.