IND vs BAN Day-Night Test: रविचंद्रन अश्विन याने नेट्समध्ये सरावादरम्यान केली सनथ जयसूर्या याच्या गोलंदाजीची नकल, व्हिडिओ व्हायरल
रविचंद्रन अश्विन (Photo Credits: Getty Images)

इंदोरमध्ये नुक्त्याच्या संपुष्टात आलेल्या पहिल्या टेस्टनंतर टीम इंडिया (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) आता कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स मैदानात आमने-सामने येण्यास तयारी करत आहे. दोन्ही संघातील हा सामना खास असणार आहे. कारण या मॅचद्वारे दोन्ही संघ पहिल्यांदा पिंक बॉलने खेळणार आहे. यामुळे दोन्ही संघ आता पिंक बॉलने इंदोरमध्ये रात्रीच्या वेळेस सराव करत आहे. याचाच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) पिंक बॉलने सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओचे वैशीष्ट्य म्हणजे नेटवर सराव करताना अश्विनने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याच्या अ‍ॅक्शनची नकल करताना गोलंदाजीचा सराव केला. अश्विन उजव्या हाताने गोलंदाजी करतो, पण सराव करताना त्याने पिंक बॉल डाव्या हाताने फेकला. त्याची ऍक्शन पाहून जयसूर्याची आठवण आली. (Ind vs Ban: कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने घेतली खास चाहत्याची भेट Video)

अश्विनने तो चेंडू फेकला तो ऑफ-स्टंपच्या बाहेर टप्पा खाऊन बाहेर गेला. मागे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी तो बॉल पकडला. अश्विनचा जयसूर्याच्या स्पेशल ऍक्शनद्वारे केलेल्या गोलंदाजीचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. नंतर अश्विनने आपल्या ट्विटर हँडलवर या बॉलिंग ऍक्शनचा व्हिडिओही पोस्ट केला आणि या नव्या गोलंदाजीचे कौशल्य चाहत्यांना दाखवले. हा व्हिडिओ शेअर करत अश्विनने कॅप्शन देत लिहिले, "ठीक आहे लोक!! चला या मजेचा अंत करू या, आपण सर्वजण सोशल मीडियावर खराब गुणवत्तेचा व्हिडिओ शेअर करीत आहात. येथे एक चांगला आहे." पाहा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अश्विनचा विडिओ:

पाहा अश्विनने शेअर केलेला हा व्हिडिओ:

दरम्यान, भारत आणि बांग्लादेशमध्ये दुसरा टेस्ट सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल. इंदोरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशवर डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता. आणि 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. आता, कोलकातामध्ये होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडिया क्लीन-स्वीप करण्याचा प्रयत्न करेल, तर बांग्लादेशकडे विजय मिळवत मालिका बरोबरीत रोखण्याची ही अंतिम संधी असणार आहे.