भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा तिसरा आणि अंतिम टी-20 नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळला जात आहे. बांग्लादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 174 धावा केल्या आहेत. पण, पहिले फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने 35 धावांवर त्यांचे दोन्ही सलामी फलंदाज-रोहित शर्मा आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांची महत्वपूर्ण विकेट गमावली. रोहित 2, तर धवन 19 धावांवर माघारी परतला. यानंत सर्व जबाबदारी मधल्या फळीवर आली. आणि आजच्या सामन्यात यांनी निराश केले नाही. के एल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी शानदार फलंदाजी केली आणि संघाच्या मोठ्या स्कोर करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. (IND vs BAN 3rd T20I: के एल राहुल, श्रेयस अय्यर यांचे झुंझार अर्धशतक; बांग्लादेशला विजयासाठी 175 धावांचे आव्हान)
राहुलने आज भारतीय संघासाठी (Indian Team) 35 चेंडूत 52 धावांचे शानदार डाव खेळला. आपल्या खेळीदरम्यान राहुलने 7 चौकार ठोकले. शिवाय, श्रेयस अय्यरनेही संघासाठी 32 चेंडूत 62 धावांची खेळी केली. धवनने आजच्या सामन्यात 16 चेंडूंत केवळ 19 धावा केल्याने सोशल मीडिया यूजर्स निराश झाले आहेत आणि त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणीही होत आहे. दुसरीकडे, ट्विटरवर श्रेयस आणि राहुल यांच्या फलंदाजीचे कौतुक केले जात आहे. इतकेच नाही, तर धोनीचा पर्याय म्हटला जाणारा रिषभ पंत (Rishabh Pant) 6 धावांवर बाद झाल्याने त्याच्यावरही टीका केली जात आहे.
भारताच्या डावानंतर यूजर्सच्या प्रतिक्रिया:
टॉप-ऑर्डरवर शिखर धवनची जागा घेण्याची वेळ आली आहे का?
Shikhar Dhawan in T20Is in 2019
12 innings
272 runs
Avg 22.66
SR 110.56
HS 41
Is it time to replace him at the top of the order?
REPLUG: https://t.co/gqaRrZ8U7B#INDvBAN
— Deepu Narayanan (@deeputalks) November 10, 2019
राहुलचा टी-20 क्रिकेटमध्ये मागील 2-3 वर्षातील सर्वोत्कृष्ट स्ट्राइक-रेट आहे
KL Rahul has the best strike-rate in T20 cricket (among top order batsmen) in the last 2-3 years. Higher than Rohit, Dhawan & Virat... including in IPL.
At some point, Indian team management has a decision to make. #INDvBAN
— Chetan Narula (@chetannarula) November 10, 2019
शिखर धवनच्या जागी सलामीवीर म्हणून रिषभ पंतला प्रयत्न करण्याबद्दल तुमचे काय मत आहे?
What's your opinion on trying Rishabh Pant as opener replacing Shikhar Dhawan who is not in great form since last one year. #AskStar @StarSportsIndia
— Hardik Purohit (@hardikpurohit25) November 10, 2019
टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून सलामीवीर म्हणून धवन हा अजून एक चांगला पर्याय आहे?
is shikhar dhawan still a good choice as a opener keeping in mind the World T20... Is this the right time to look for the options available before #Mission2020 https://t.co/n53rwK6CM6
— mayur gaikwad (@mayu271988) November 10, 2019
जेव्हा शिखर धवन टी -20 मध्ये खेळतो ..
भारतीय चाहते
whenever shikhar dhawan plays in t20s for india..
indian fans: #INDvBAN pic.twitter.com/OcpImSU9jW
— mani ਮਨੀ 🇮🇳🇳🇿 (@chaotic_monk_) November 10, 2019
धोनी संघात परत येण्यासाठी रिषभ पंत प्रयत्नशील
Rishab Pant trying hard to get dhoni back in the team.
Selfless talent.#Dhoni #AskStar #BANvIND #INDvBAN #INDvsBAN #BCCI
— Vikas Mehta (@vikas04_06) November 10, 2019
मनीष पांडेला पंतच्या आधी फलंदाजीसाठी पाठवायचे
M.Pandey should be sent a Head of Pant . Since He is a specialized Batsman today.
Else taking him in XI itself is not Fair idea
Also Dube has heavy job a head
— Sankar (@sankarzangar) November 10, 2019
दरम्यान मधल्या फळीतील फलंदाज श्रेयसने आपल्या आंतरराष्ट्रीयटी-20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. अय्यरने राहुलसह चांगली भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले आणि त्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रोहित लवकर बाद झाल्याने श्रेयस तिसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आला. अय्यरने या संधीचा चांगला फायदा उठविला आणि टी-20 कारकीर्दीतील सर्वात मोठा डाव त्याने खेळला.