श्रेयस अय्यर, के एल राहुल (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार महमूदुल्लाने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पहिले फलंदाजी करत भारताने निर्धारित ओव्हरमध्ये 175 धावांचे लक्ष्य दिले आहेत. भारताकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने सर्वाधिक 62 धावा केल्या, तर के एल राहुल (KL Rahul) 52 धावांवर माघारी परतले. दोन्ही संघातील आजचा हा निर्णायक सामना आहे. यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये बांग्लादेश (दिल्ली) आणि भारताने (राजकोट) विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा हा सामना दोन्ही संघासाठी करो-या-मरोचा सामना आहे. या सामन्यात प्रभाव म्हणजे मालिकाही गमावली. (IND vs BAN 3rd T20I: शिखर धवन याने टी-20 क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या 1500 धावा; रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह 'या' एलिट यादीत झाला समावेश)

आजच्या निर्णायक सामन्यात टॉस गमावल्यावर पहिले बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये शफीउल इस्लाम याने कर्णधार रोहित शर्मा याला 2 धावांवर बाद केले. याच्यानंतर शिखर धवन याने राहुलच्या साथीने मोठे शॉट खेळात डाव सावरण्याचा प्रयत्न केलं, पण धवन पुन्हा एकदा मोठा डाव खेळू शकला नाही आणि १९ धावांवर शफीउलच्या गोलंदाजीवर बांग्लादेशी कर्णधार महमुदुल्लाह याच्या हाती झेल बाद झाला. नंतर राहुलने श्रेयसच्या साथीने चांगली भागीदारी करत चौकार आणि षटकार मारत भारताचा स्कोर १०० च्या पुढे नेला. बांग्लादेशी फिल्डर्सकडून आजच्या सामन्यात चुकीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. श्रेयसला शून्यावर पहिले जीवदान मिळाले. श्रेयसकडून आजच्या सामन्यात चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. श्रेयसने अफीफ हुसेन (Afif Hossain) याच्या ओव्हरमध्ये सलग 3 षटकार लगावले. त्याने केवळ 27 चेंडूत पहिले टी-20 अर्धशतक पूर्ण केले.

मालिकेच्या निर्णयात भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघात बदल केला. मनीष पांडे यांना कृणाल पंड्याची जागा घेण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे, या सामन्यासाठी बांग्लादेश संघात एक बदल झाला आहे. कर्णधार महमूदुल्लाने मोसादेक हुसेन याच्या जागी मोहम्मद मिथून याला संधी दिली आहे.