India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 2 गडी गमावून 26 धावा केल्या होत्या. दुसरा आणि तिसरा दिवस पावसाने पूर्णपणे वाहून गेल्यानंतर बांगलादेशने आपला डाव 107 धावांवरुन पुन्हा सुरु केला. चौथ्या दिवसाच्या खेळात एकूण 18 विकेट पडल्या आणि दिवसभरात एकूण 437 धावा झाल्या. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात शादमान इस्लामने 7 धावा केल्या आणि पहिल्या डावातील शतकवीर मोमिनुल हक दुसऱ्या डावात अद्याप खातेही उघडू शकलेला नाही. (हेही वाचा - India vs Bangladesh 2nd Test Day 4 Stumps Scorecard: दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी अखेर बांग्लादेश 2 बाद 26; अश्विनने मिळवले दोन्ही विकेट)
भारताने पहिला डाव 285 धावांवर घोषित केला. बांगलादेश पुन्हा फलंदाजीला आला तेव्हा शदमान इस्लाम आणि झाकीर हसन विकेट वाचवण्याच्या इराद्याने खेळताना दिसले. पण रविचंद्रन अश्विनने या बचावात्मक रणनीतीचा पुरेपूर फायदा उठवला. त्याच्या फिरणाऱ्या चेंडूंनी दुसऱ्या डावात बांगलादेशचे 2 बळी घेतले. चौथ्या दिवशी बांगलादेशची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावांवर पोहोचली असून दुसऱ्या डावात ते अजूनही भारतापेक्षा 26 धावांनी मागे आहे.
पहिल्या दिवशी 35 षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये बांगलादेशने 3 विकेट गमावून 107 धावा केल्या. चौथ्या दिवशी मैदानावर आल्यानंतर लगेचच 11 धावा करून मुशफिकुर रहीम बाद झाला, पण मोमिनुल हक दुसऱ्या टोकाकडून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. त्याने 107 धावांची नाबाद खेळी खेळली आणि आपल्या संघाला 233 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 बळी घेतले.
भारताने फलंदाजीत खळबळ उडवून दिली
भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी येताच तुफानी फलंदाजीला सुरुवात केली. जैस्वाल आणि रोहितने मिळून केवळ 3 षटकात 51 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 23 धावा करून बाद झाला, तर दुसरीकडे जैस्वालने अवघ्या 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचा डाव 72 धावांवर संपला. सामन्याला फक्त एक दिवस शिल्लक असल्याने सर्व भारतीय फलंदाज आक्रमक खेळ करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. विराट कोहलीने 47 धावांची वेगवान खेळी खेळून भारताला 285 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तर केएल राहुलने 68 धावांची वेगवान आणि महत्त्वपुर्ण खेळी खेळली. भारताने आपला डाव 285 धावांवर घोषित केला.