IND vs BAN 2nd Pink Ball Test: विराट कोहली याच्या रेकॉर्ड शतकाने टीम इंडिया मजबूत, Lunch पर्यंत भारताचा स्कोर 289/4
(Photo Credit: IANS)

बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध कोलकातामधील दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या लंचची वेळ झाली आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये भारतीय संघ (Indian Team) मजबूत स्थितीत आहे. बांग्लादेशला पहिल्या डावात 106 धावांवर ऑल आऊट केल्यावर टीम इंडियाने लंचपर्यंत 4 विकेट गमावून 289 धावा केल्या आहेत. यादरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) याने टेस्ट कारकिर्दीतील 27 वे तर आंतरराष्ट्रीय करिअरमधील 70 वे टेस्ट शतक केले आहे. लंचपर्यंत टीम इंडियाकडे पहिल्या डावांत फलंदाजी करत 183 धावांची आघाडी मिळाली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशी कर्णधार मोमिनुल हक याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली, परंतु पहिल्या दिवशी भारतीय संघा वर्चस्व गाजवले. आणि दुसऱ्या दिवशीही असेच चित्र  विराटने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या साथीने दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. दोघांमध्ये 99 धवनची भागीदारी झेलली असताना रहाणे कॅच आऊट झाला. यापूर्वी, रहाणेने अर्धशतक पूर्ण केले होते आणि तो 51 धावांवर तैजुल इस्लाम (Taijul Islam) याच्या चेंडूवर इबादत हुसेन याच्या हाती कॅच आऊट झाला. (IND vs BAN 2nd Pink Ball Test: विराट कोहली याचा करिष्मा, तोडला कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा शतकांचा रेकॉर्ड)

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. बांग्लादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात दुहेरी शतक करणारा मयंक अग्रवाल दुसऱ्या सामन्यात 14 धावा करू शकला. त्यानंतर रोहित शर्मा याला इबादत हुसेन याने 21 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले.  त्यानंतर विराट आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी संघाचा डाव सावरला. पुजाराने अर्धशतक झळकावले.  ऐतिहासिक गुलाबी बॉल कसोटी सामन्यात बांग्लादेशने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु इशांत शर्मा आणि उर्वरित भारतीय वेगवान गोलंदाजांच्या वेगवान गोलंदाजीच्या पुढे जात काळ टिकू शकला नाही आणि 106 धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून इशांत शर्मा (Ishant Sharma) याने 5, उमेश यादव याने 3 आणि मोहम्मद शमी याने बांग्लादेशचे 2 गडी बाद करत यजमान संघाची स्थिती मजबूत केली. बांग्लादेश संघाच्या 9 फलंदाजांना दाहीचा आकडाही ओलांडता आला नाही. त्यांचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. शादमान इस्लाम (Shadman Islam) याने सर्वाधिक 29, लिटन दास (Liton Das) याने 24 आणि नईम हसन (Nayeem Hasan) याने 19 धावांचे योगदान दिले.

यापूर्वी इंदोरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता, त्यामुळे आता दुसरा सामना जिंकत टीम इंडिया 2 सामन्यांच्या मालिकेत क्लीन-स्वीप करू पाहत आहे.