टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट सामन्याच्या दुसर्या दिवशी आश्चर्यकारक शतक झळकावले आणि गुलाबी बॉलने कसोटी सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. कोहलीचे हे एकूण 27 वे कसोटी शतक आहे. कोहलीने 68 व्या ओव्हरमध्ये तैजुल इस्लाम (Taijul Islam) याच्या तिसर्या बॉलवर दोन धावा फटकावल्या आणि गुलाबी बॉलने पहिले कसोटी शतक पूर्ण केले. विराटने 159 चेंडूत 12 चौकार ठोकत शतक पूर्ण केले. या शतकासह विराटने आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील विराटचे एकूण 70 वे शतक आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांच्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणारा विराट जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. सचिन 100 शतकांसह अव्वल स्थानावर आहे तर 71 आंतरराष्ट्रीय शतकांसह पाँटिंग दुसर्या स्थानावर आहे. (IND vs BAN 2nd Pink Ball Test: विराट कोहली याच्या रेकॉर्ड शतकाने टीम इंडिया मजबूत, Lunch पर्यंत भारताचा स्कोर 289/4)
मात्र, वेगवान 70 आंतरराष्ट्रीय शतकं करण्याच्या बाबतीत कोहलीने सचिनला मागे टाकले आहे. कोहलीने 439 डावात हा आकडा गाठला, तर पॉन्टिंगने 649 डाव आणि सचिनने 505 डाव घेतले होते. यापूर्वी, पहिल्या दिवशी कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून सर्वात जलद 5000 धावा पूर्ण केल्या आणि रिकी पॉन्टिंगलाही मागे टाकले. शिवाय, कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत कोहलीने पॉन्टिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दोन्ही कर्णधार म्हणून 41 शतकं केली आहेत. मात्र, कोहलीने ही कामगिरी सर्वात जलद गतीने केली आहे. कोहलीने 188 डावात 41 शतकं ठोकली तर पाँटिंगने 376 डावात हे केले होते.
20th Test century as Captain of India ✅
27th Test century of his career ✅
70th International century ✅
41st international century as captain (joint-most)✅
1st Indian to hit a century in day/night Test ✅#KingKohli pic.twitter.com/q01OKPauOu
— BCCI (@BCCI) November 23, 2019
या शतकी खेळीमुळे विराट डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये शतक झळकावणारा कोहली हा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. बांग्लादेशविरुद्ध सध्या सुरु असलेल्या सामन्यात विराटने 12 चौकारांच्या मदतीने शतक केले. यासह टीम इंडिया आता दुसऱ्या टेस्टमध्ये मजबूत स्थितीत पोहचली आहे. बांग्लादेशच्या पहिल्या डावाविरुद्ध भारताने पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली आहे.