रविचंद्रन अश्विन याने केली डाव्या हाताने फलंदाजी, 'रिषभ पंत पेक्षा चांगला' म्हणत Netizens ने केले पंतला ट्रोल
(Photo Credit: Instagram/Getty)

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) कसोटी क्रिकेटमधील सध्या चांगल्या लयीत दिसत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध तीन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतही त्याने शानदार कामगिरी केली होती. टेस्ट क्रिकेटमधील अश्विन भारताचा समस्यानिवारक आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. गोलंदाजीनंतर अश्विनने फलंदाजीतही कमाल केली आहे. बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध इंदोर टेस्टच्या पहिल्याच दिवशी त्याने शानदार गोलंदाजी केली आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. यानंतर अश्विन सोशल मीडियावर चर्चेत बनला आहे, आणि तेही त्याच्या गोलंदाजीची नाही तर फलंदाजीमुळे आहे. टेस्ट चार शतकं करणारा अश्विन इंदोरमध्ये मालिकेच्या पहिल्या दिवशी डाव्या हाताने फलंदाजी करताना दिसला. भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये अश्विन डाव्या हाताने फलंदाजी करत शॉट्स खेळताना दिसतोय. (IND vs BAN 1st Test: हॉटेलमध्ये परतल्यावर तू काय करतो? पत्रकारने विचारलेल्या प्रश्नाला मयंक अग्रवाल याने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही होईल हसू अनावर, पाहा Video)

या पोस्टच्या खाली असलेल्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, "नाही तुम्हाला तुमचा फोन तपासण्याची गरज नाही, अश्विन हा डाव्या हाताने फलंदाजी करीत आहे." हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच अश्विनच्या डाव्या हाताने फलंदाजी करण्याच्या क्षमतेमुळे लोक आश्चर्यचकित झाले. त्याच्या एका चाहत्याने म्हटले की, 33 वर्षीय अश्विन भारतीय विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यापेक्षाही उत्तम फलंदाजी करतो. दरम्यान, नुकत्याच केलेल्या काही कामगिरीमुळे पंतवर बरीच टीका होत आहे. बांग्लादेशविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्याआधी भारताचा कर्णधार रोहित शर्मा यानेही चाहत्यांना पंतपासून दूर राहण्याची विनंती केली होती. हिंदीमध्ये आणखी एका चाहत्याने सांगितले की, “धोनीकडून शिकला असावा”. पंतपेक्षा चांगला, दुसर्याने म्हटले.

 

View this post on Instagram

 

No. Do not check your phone 😆😂 It's indeed a left-handed Ashwin Batting 😮😉 #TeamIndia #INDvBAN

A post shared by Team India (@indiancricketteam) on

सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतानेबांग्लादेशला पहिल्या डावात केवळ 150 धावांवर बाद केले. त्यानंतर पहिला डाव 493 डावांवर घोषित केला आणि बांग्लादेश संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करत 4 बाद 60 धावा केल्या आहे. लंचपर्यंत भारत बांग्लादेशच्या 283 धावांच्या पिछाडीवर आहे.