टीम इंडियाचा सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये दुसरे दुहेरी शतक ठोकले. भारताकडे आता 209 धावांची आघाडी आहे. कसोटीत षटकार मारत 200 धावा करणारा मयंक दुसरा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) याने हा पराक्रम केला होता. रोहितने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात दुहेरी शतक षटकार मारत पूर्ण केले होते. मयंकने दुसरा दिवस आपल्या नावावर केला. दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला सुरुवातीला दोन मोठे झटके बसले. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) लवकर बाद झाले. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पुजाऱ्याने टेस्टमध्ये 23 वे अर्धशतक केले आणि 54 धावांवर कॅच आऊट झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दुसर्या दिवसाच्या पहिल्या सत्राची फलंदाजी करत 81 चेंडूत 37 धावा करून मयंक नाबाद परतला. यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी शानदार शतक करत संघाला बांग्लादेशला मोठी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दिवसाशी मयंकने उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या साथीने 190 धावांची भागीदारी केली. यादरम्यान मयंकने तिसरे टेस्ट शतक केले आणि रहाणेने 20 वे अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान रहाणेने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 4000 धावाही पूर्ण केल्या. (स्वतः शून्यावर बाद झाला तरी विराट कोहली याने मयंक अग्रवाल याला 200 धावा करण्यासाठी दिले प्रोत्साहन, पाहा Video)
दरम्यान, मयंकचे हे दुसरे दुहेरी शतक आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत मयंकने दोन शतकं ठोकली होती. यात एका दुहेरी शतकाचाही समावेश होता. दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात भारताने पुजाराची पहिला विकेट गमावला. त्यानंतर खाते न उघडता कोहलीची पॅव्हेलियनमध्ये परतला.
A second Test double century in five innings for Mayank Agarwal 2️⃣0️⃣0️⃣
What a season he's having 👏#INDvBAN pic.twitter.com/kCPzApFHVU
— ICC (@ICC) November 15, 2019
बांग्लादेश संघ पहिल्या डावात 150 धावांवर ऑल आऊट. बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीम याने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार मोमीनुल हक याने 37 आणि लिटन दास याने 21 धावांचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमी याने तीन आणि ईशांत शर्मा, उमेश यादव आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.