IND vs BAN (Photo Credit - X)

चेन्नई: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारपासून (19 सप्टेंबर) चेन्नई (Chennai) येथे खेळवला जाणार आहे. गेल्या आठवडाभरापासून दोन्ही संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर 9.00 वाजता नाणेफेक होईल. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे. (हे देखील वाचा: India vs Bangladesh 1st Test Weather Update: क्रिकेटप्रेमीसाठी वाईट बातमी! चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता, जाणून घ्या कसे असेल हवामान)

वाचा हेड टू हेड आकडेवारी?

बांगलादेशला कसोटी सामन्यात वर्चस्व गाजवण्याची संधी भारताने अद्याप दिलेली नाही. बांगलादेश संघाला आतापर्यंत भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 13 पैकी 11 सामने जिंकले असून दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. 2001-01 मध्ये जेव्हा दोन्ही देशांदरम्यान पहिला कसोटी सामना खेळला गेला तेव्हा बांगलादेश हा क्रिकेटचा पोर होता आणि आज तो प्रतिस्पर्धी संघ बनला आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने बाजी मारली होती. चार वर्षांनंतर 2004-05 मध्ये भारताने पुन्हा बांगलादेशी भूमीवर सामना खेळला. यावेळी दोन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाचा सफाया झाला.

पहिल्या कसोटीत बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसैन शांतो, मोमिनुल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, लिटन दास, मेहंदी हसन मेराज, तैजुल इस्लाम, नाहिद राणा आणि हसन महमूद/तस्कीन अहमद.

पहिल्या कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.