IND vs BAN 1st Test Day 3: टीम इंडियाचा पहिला डाव 493/6 वर घोषित, बांग्लादेशवर पराभवाचे संकट
टीम इंडिया (Photo Credit: IANS)

भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने संघाच्या पहिल्या डावाची घोषणा केली आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विशाल धावांच्या आघाडीसह डाव घोषित केला. बांग्लादेश (Bangladesh0 संघाला पहिल्या डावात 150 धावांवर ऑल आऊट केल्यावर टीम इंडियाने 6 बाद 493 धावांवर डाव घोषित केला. सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्या दुहेरी शतकाच्या मदतीने भारतीय संघाने बांग्लादेशला बॅकफूटवर ढकलले. मयंकने 343 धावांची खेळी करत संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. 343 धावांच्या स्कोअरपेक्षा कमी बांग्लादेश संघ बाद झाला तर भारतीय संघ धावा आणि डावाच्या फरकाने हा सामना जिंकेल आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेईल. (IND vs BAN 1st Test: हॉटेलमध्ये परतल्यावर तू काय करतो? पत्रकारने विचारलेल्या प्रश्नाला मयंक अग्रवाल याने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही होईल हसू अनावर, पाहा Video)

या सामन्यात बांग्लादेश संघाचा कर्णधार मोमीनुल हक (Mominul Haque) याने महत्त्वपूर्ण टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, बांग्लादेशी टायगर्स भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर अवघ्या 150 धावांवर ऑल आऊट झाले. बांग्लादेश संघाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. दुसरीकडे, भारताकडून मयंकने 243 धावा केल्या. याशिवाय चेतेश्वर पुजारा याने 54, अजिंक्य रहाणे 86 आणि रवींद्र जडेजा नाबाद 60 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघाने एकूण 114 षटकांत फलंदाजी केली आणि 6 बाद 493 धावांची भव्य धावसंख्या उभारली.

पहिल्या सत्रात दोन विकेट गमावल्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात बांग्लादेशला बॅकफूटवर ढकलले होते. बांग्लादेशकडून अबू जायद याने 4 तर इबादत हुसेन आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.