IND vs BAN 1st Test Day 2: दुसऱ्या दिवशी भारताने गमावल्या दोन विकेट; Lunch पर्यंत टीम इंडियाचा स्कोर 188/3, मयंक अग्रवाल शतकाच्या जवळ
मयंक अग्रवाल (Photo Credits: IANS)

टीम इंडिया (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात पहिल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये सुरु आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 बाद 86 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बांग्लादेशी गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत सुरुवातीलाच भारताला दोन मोठे झटके दिले. दुसऱ्या दिवसाचा लंच झाला तेव्हा भारताने 3 बाद 188 धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) अजून एका टेस्ट शतकाच्या जवळ पोहचला आहे. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नाबाद 35 धावांवर खेळत आहे. दुसऱ्या दिवशी बांग्लादेशकडून अबू जायद याने दोन गडी बाद केले. दिवसाच्या सुरुवातीला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) येईन अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर सैफ हसन (Saif Hassan) याच्या हाती कॅच आऊट झाला. पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक फक्त 68 चेंडूत केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार विराट कोहली 2 चेंडू खेळत शून्यावर माघारी परतला. (IND vs BAN 1st Test: रवींद्र जडेजा याने शानदार फिल्डिंगद्वारे केली कमाल, रॉकेट थ्रो ने केले तैजुल इस्लामला रन आऊट, पाहा Video)

इंदोरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशला 150 धावांवर ऑल आऊट केले. त्यानंतर भारताने फलंदाजी करताना पहिल्या दिवशी केवळ एक विकेट गमावली होती. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पुजारानंतर सलामी फलंदाज मयंकने 98 चेंडूत कसोटी कारकीर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले.

या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यासह बांग्लादेशने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धे पदार्पण केले आहेत. कर्णधार मोमिनुल हक याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांग्लादेशचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. मोमिनुलने 43, तर त्यांचा स्टार फलंदाज मुशफिकुर रहीम याने 37 धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून मोहम्मद शमी याने 3 खेळाडूंना पॅव्हेलियनचा रास्ता दाखवला. उमेश यादव, आर अश्विन आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.