विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Getty)

IND vs AUS Test Series 2020-21: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ (India Tour of Australia) आणि यजमानास संघातील मर्यादित ओव्हरमधील लढत मनोरंजक ठरली, पण आता तीच लढत कडक होईल जेव्हा दोन्ही संघ चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) आमने-सामने येतील. वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया तर टी-20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) वर्चस्व गाजवले, कसोटीमधील चित्र काहीसे वेगळे आहे. 17 डिसेंबर रोजी दिवस/रात्र सामन्याने मालिकेची सुरुवात होईल. 2018-19 दौऱ्यावर यजमान संघावर सत्ता गाजवलेल्या भारतीय संघासाठी मालिकेची सुरुवात मोठी दुखी सिद्ध होण्याची शक्यता आहे. गुलाबी चेंडूने पहिला सामना खेळला जाणार असून ऑस्ट्रेलियाचा यामध्ये बोलबाला आहे. भारत (India) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) सुरु होणाऱ्या या पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यापूर्वी आपण काही आकडेवारी पाहूया जे या फॉरमॅटमध्ये कांगारू संघाच्या सत्तेचे प्रमाण देते. (IND vs AUS Test 2020-21: भारतीय संघाच्या डोकेदुखीत वाढ; ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात सामील होणार 'हा' वेगवान गोलंदाज)

ऑस्ट्रेलियाने आजवर सहा दिवस/रात्र सामने खेळले असून सर्वांमध्ये विजय मिळवला आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे हे सर्व त्यांनी घरच्या मैदानावर खेळत जिंकले आहेत, त्यामुळे पिंक-बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया अजेय आहेत. शिवाय, फलंदाज आणि गोलंदाजही आपापल्या यादीत अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने चार पिंक-बॉल सामने अ‍ॅडिलेड आणि दोनदा ब्रिस्बेनमध्ये खेळत जिंकले आहेत. अशा स्थिती कांगारू संघाने अद्याप गुलाबी टेस्टमध्ये पराभवाची चव चाखली नाही. दुसरीकडे, भारताने बांग्लादेशविरुद्ध 2019 मध्ये पहिल्यांदा दिवस/रात्र सामन्याचा आनंद लुटला. पिंक-बॉल टेस्टमध्ये अनुभवी डेविड वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. वॉर्नरने 5 सामन्यात 534 धावा केल्या आहेत तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 335 धावांची खेळी केली होती जी डे-नाईट चकमकीतील वैयक्तिक धावसंख्या आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 4 बाद 589 धावा केल्या ज्या अ‍ॅडिलेडमध्ये दिवस/रात्र टेस्टमधील संघाने केलेली सर्वाधिक धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक पिंक बॉल टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत. 7 कसोटींमध्ये स्टार्कने 42  आणि त्यानंतर जोश हेजलवुडने पाच सामन्यात 22 गडी बाद केले आहेत.

नोव्हेंबर 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध वॉर्नर आणि लाबूशेन यांच्यातील दुसर्‍या विकेटसाठी 361 धावांची भागीदारी ही अ‍ॅडिलेडमध्ये पिंक-बॉल टेस्टमधील सर्वाधिक भागीदारी आहे. ही आकडेवारी पाहता अ‍ॅडिलेडमध्ये पहिली कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाला कसून मेहनत करावी लागणार आहे असे दिसत आहे.