IND vs AUS Test 2020-21: 17 डिसेंबरपासून यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघात (Indian Team) कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुखापतीने सत्र सुरु असताना संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) पुन्हा ऑस्ट्रेलिया कसोटी संघात दाखल होणार आहे. कौटुंबिक आजारामुळे स्टार्कने टी-20 मालिकेतून माघार घेतली होती. मालिकेच्या उर्वरित सामन्यातून मागे घेण्यापूर्वी स्टार्कने भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेचा पहिला टी-20 खेळला होता. वेगवान गोलंदाजच्या जाण्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आणि त्यांना 2-1 ने मालिका गमवावी लागली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या परतण्याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. CAने शेअर केलेल्या निवेदनात प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) म्हणाले की, "या कठीण वेळी मिचसाठी आम्हाला वाईट वाटते आणि त्याने आपल्या कुटुंबासमवेत घालवल्यामुळे आनंद झाला आहे," सोमवारी संघात त्याचे पुन्हा स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत." (IND vs AUS 1st Test: पहिल्या पिंक-बॉल टेस्टसाठी मार्कस हॅरिस ऑस्ट्रेलियन संघात सामील, दुखापतीने Will Pucovski याचे पदार्पण लांबणीवर)
स्टार्क सोमवारी चार्टर्ड विमानाने अॅडलेडमध्ये संघात सामील होणे अपेक्षित आहे. संघाच्या संयोजनामुळे संघर्ष करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी स्टार्कचा समावेश मोठा दिलासादायक ठरेल. पहिल्या कसोटी सामन्यात स्टार्क, जोश हेझलवुड आणि पॅट कमिन्स या तिघांची प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान असण्याची शक्यता आहे, तर सध्या सुरू असलेल्या पिंक-बॉल सराव सामन्या दरम्यान कॅमरून ग्रीनच्या डोक्यावर चेंडू लागल्याने सध्या गोलंदाज मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी फिट होण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिवाय, सिडनी येथे भारत अ संघाविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात कन्क्शन दुखापत झाल्याने सलामीवीर विल पुकोव्स्कीच्या उपलब्धतेबद्दल संभ्रम कायम आहे. सलामीवीर जो बर्न्स सध्या फॉर्मसाठी झगडत आहे आणि सराव सामन्यात त्याची कामगिरी उठावदार राहिली नाही.
JUST IN: Mitch Starc is set to re-join the Aussie squad after taking family leave. Full story: https://t.co/9wpbfUhyln #AUSvIND pic.twitter.com/m6pp8MzRwZ
— cricket.com.au (@cricketcomau) December 13, 2020
डेविड वॉर्नर पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याने ऑस्ट्रेलिया अद्याप सलामी जोडीच्या शोधात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अॅडिलेड येथे पिंक-बॉल टेस्टने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलिया सध्या गुलाबी बॉल क्रिकेटमधील सर्वात यशस्वी टीम आहे. त्यांनी सर्व घरच्या मैदानावर खेळत, अॅडलेडमध्ये चार आणि ब्रिस्बेनमध्ये दोनदा असे एकूणसहा पैकी सहा सामने जिंकले आहेत. स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून 6 सामन्यात 33 विकेट घेतल्या आहेत.