IND vs AUS Test 2020-21: टीम इंडियासाठी खुशखबर! रोहित शर्मा मेलबर्न येथे 'या' दिवशी टेस्ट संघात होणार सामील, तिसरा सामना खेळण्याबाबत शंका कायम
रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

IND vs AUS Test 2020-21: ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यापासून काही तास दूर असलेला भारताचा (India) सलामी फलंडनज रोहित शर्मा (Rohit Shamra) पुढील काही तासांत कसोटी संघात सामील होईल. ANI च्या अहवालानुसार रोहित सिडनीहून मेलबर्नसाठी (Melbourne) रवाना होईल आणि बुधवार, 30 डिसेंबर रोजी संघात सामील होईल. रोहित सध्या सिडनीमधील त्याच्या हॉटेलच्या खोलीत क्वारंटाइन आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडेमीमध्ये (National Cricket Academy) फिटनेस टेस्ट क्लीयर केल्यानंतर 33-वर्षीय रोहित ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला होता. रोहितला 14-दिवसांच्या क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागल्याने त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या निवडीसाठी तो उपलब्ध नव्हता. मात्र, आताही रोहितचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होणार की नाही यावर संभ्रम कायम आहे. बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले होते की क्वारंटाइन कालावधीनंतर रोहितच्या फिटनेसचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. आयपीएल 2020 फायनल सामन्यापासून रोहित स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. (Highest Paid Indian Cricketer in 2020: हे तर नवलच! विराट कोहली नव्हे 2020 मध्ये 'हा' बनला सर्वाधिक मानधन घेणारा भारतीय क्रिकेटपटू)

रोहितची कसोटी संघात निवड झाली परंतु वैयक्तिक कारणास्तव इतर सदस्यांसह तो उड्डाण करु शकला नाही. नोव्हेंबरमध्ये तो फिटनेस टेस्ट पास करण्यासाठी एनसीएमध्ये पोहचला होता आणि 11 डिसेंबर रोजी टेस्ट उत्तीर्ण झाल्यावर त्याला ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. आयपीएल 2020 दरम्यान रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. दरम्यान, ANI च्या अहवालानुसार मालिकेचा तिसरा कसोटी सामना सध्या सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळला जाईल. तिसरा कसोटी सामना आयोजित केल्या जाणाऱ्या सिडनीमध्ये कोविड-19 चा उद्रेक झाल्याने खेळाचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतण्यात आला असून या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात भारतीय संघ विजयापासून अवघी काही पावलं दूर आहेत. पहिल्या डावात कांगारू संघाविरुद्ध 131 धावांची आघाडी घेतल्यावर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात फक्त 5 धावांनी पुढे आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे चौथ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावून 136 धावा केल्या आहेत. टॉप-ऑर्डर अपयशी ठरल्यावर कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स यांच्यावर चौथ्या दिवशी आघाडी वाढवण्याची जबाबदारी असेल.