टीम इंडिया (Photo Credit: PTI)

Highest Paid Indian Cricketer in 2020: भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा स्टारडम किंवा सर्वाधिक कमाईची वेळ येते तेव्हा गोलंदाजांच्या पुढे फलंदाजांची नावे या यादीमध्ये नेहमी पाहायला मिळतात. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे देशातील सर्वात महागड्या क्रिकेटपटूंपैकी आहेत. निवृत्तीनंतरही महेंद्र सिंह धोनी बहुतेक क्रिकेटपटूंपेक्षा अधिक कमाई करतो. 2020 ने जिथे जवळपास प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत लोकांना आश्चर्यचकित केले आहे, आता क्रिकेटपटूंच्या कमाईच्या बाबतीत चाहत्यांपुढे एक नवीन व्यक्तिरेखा सादर केली आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघाकडून (Indian Team) खेळत यावर्षी बीसीसीआयचा सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू (Highest Paid Indian Cricketer) बनला आहे. बुमराहने या यादीत कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे सोडलेच, पण लक्षात घेण्यासारखे म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत पहिल्या-5 खेळाडूंमधून गायब आहे. 2020 मध्ये बुमराहने 4 टेस्ट, 9 वनडे आणि 8 टी-20 सामने खेळले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) एका भारतीय क्रिकेटपटूला कसोटी सामना खेळण्यासाठी 15 लाख रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख आणि प्रति टी-20 सामन्यासाठी 3 लाख मॅच फी दिली जाते. अशाप्रकारे, बुमराहने 2020 मध्ये 1.38 कोटी रुपयांची कमाई केली जी कोणत्याही भारतीय क्रिकेट खेळाडू पेक्षा अधिक आहे. ही रक्कम त्याच्या कराराच्या फीबरोबरच आहे. दुसरीकडे, कोहलीने 2020 मध्ये भारतासाठी 3 कसोटी, 9 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले. ज्यानुसार त्याने बोर्डाकडून 1.29 कोटी रुपयांची कमाई केली. या यादीमध्ये बुमराहनंतर सर्वाधिक मॅच फी मिळालेला कोहली दुसरा भारतीय क्रिकेटर आहे. बुमराह आणि विराटनंतर रवींद्र जडेजाने यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. त्याने एका वर्षात 2 कसोटी, 9 एकदिवसीय आणि 4 टी -20 सामने खेळले. ज्यात त्याला एकूण 96 लाख अशी मॅच फी मिळाली.

2020 मध्ये सामना शुल्काद्वारे कमाईच्या बाबतीत रोहित पहिल्या 5 क्रिकेटपटूंमध्येही सामील होण्यात अपयशी ठरला. रोहितने यावर्षी 3 एकदिवसीय सामने आणि 4 टी -20 सामने खेळले आणि यावर्षी एकूण 30 लाख रुपयांची मॅच फी मिळाली. विशेष म्हणजे, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांना रोहितपेक्षा अधिक मॅच फी मिळाली. रहाणेला 2020 मध्ये 4 टेस्ट सामन्यांने 60 मॅच फी मिळवून दिली. पंतने यावर्षी 3 कसोटी, एक वनडे आणि 2 टी -20 सामने खेळले आणि यंदा त्याला एकूण 57 लाख रुपयांची मॅच शुल्क मिळाले.