COVID-19 Scare on IND-AUS 3rd Test: सिडनी (Sydney) कसोटीला अद्याप अडीच आठवड्यांहून अधिक कालावधी बाकी आहे आणि सामन्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंडळ घाई करणार नाही, असे मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (Cricket Australia) अंतरिम मुख्य कार्यकारी निक निक यांनी व्यक्त केले. भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळला जाणार आहे. परंतु रविवारी सिडनीतील कोविड-19 प्रकरणांचा क्लस्टर आणि राज्य सीमा बंद झाल्याने क्रिकेट अधिकाऱ्यांची गंभीर डोकेदुखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "तिसरी कसोटीसाठी अडीच आठवड्यांहून अधिक काळ आहे, ज्यामुळे आम्हाला सिडनीच्या उत्तर किनाऱ्यांवरील विकसनशील सार्वजनिक आरोग्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यास वेळ मिळाला आहे. आम्ही आमच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही आणि सिडनीमध्ये सामना खेळण्यास आमचे प्राधान्य आहे." हॉक्ले म्हणाले. (IND vs AUS 1st Test 2020: पिंक-बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजयीरथ सुरूच, अॅडिलेड कसोटीत Aussie संघाची 'विराटसेने'वर मात)
“CA ने उन्हाळ्याच्या काळात कोविड-19 हॉटस्पॉट्स आणि राज्य सीमा बंद होण्याची शक्यता तयार केली आहे.” सध्याच्या वेळापत्रकानुसार सिडनी मालिकेच्या तिसर्या कसोटी सामन्याचे आयोजन करणार असून ब्रिस्बेन कसोटी मालिकेचा अंतिम सामना गब्बा येथे 15 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. पण ऑस्ट्रेलियामधील माध्यमांच्या वृत्तानुसार अनेक पर्यायांवर विचार केला जात आहे. दरम्यान, सिडनीमधील ताज्या कोविड-19 क्लस्टरमुळे सिडनी ते होबार्ट नौका शर्यत रद्द करण्यात आली असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी आयोजनावरही शंका व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलिया कसोटी संघात प्रवेश घेण्यासाठी सिडनीतील खेळाडू डेविड वॉर्नर आणि सीन एबॉट शनिवारी नियोजित वेळेपूर्वी मेलबर्नसाठी रवाना झाले आहेत.
Cricket Australia have issued a statement about the SCG Test and the city's COVID-19 outbreak #AUSvIND https://t.co/dA00lGzlEt
— cricket.com.au (@cricketcomau) December 20, 2020
चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारत 8 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताला दुसर्या डावात 36 धावांवर गुंडाळले आणि यजमान संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने 21 ओव्हरमध्ये आठ विकेट राखून धावसंख्येचा सहज पाठलाग केला.