एमएस धोनी, विराट कोहली (Photo Credit: Getty)

IND vs AUS T20I 2020: केवळ त्याचे चाहतेच नाही तर कर्णधार विराट कोहलीसह (Virat Kohli) त्याचा माजी साथीदारांनाही महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) आठवण येत असल्याचे दिसत आहे. वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) टीम इंडिया (Team India) सध्या मर्यादित षटकांची मालिका खेळत असून तेथे त्याची उपस्थिती जाणवून देण्याची खात्री त्याचे चाहते करीत आहेत. सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) भारतीय चाहत्यांच्या बॅनरवर कॅप्टन कोहलीची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. सध्या सुरू असलेल्या 3-सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या टी-20 दरम्यान 'We Miss You MS Dhoni' बॅनर दिसला. आणि डीपवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराटने चाहत्यांवर पहिले आणि "मलाही" असा सिग्नल दिला. सिडनी (Sydney) येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या तुफानी नाबाद 42 धावांच्या बळावर टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव करून मालिका खिशात घातली. (IND vs AUS 3rd T20I: भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' खेळाडूंना संधी)

यादरम्यान, धोनीच्या पोस्टरवरील भारतीय कर्णधार विराटच्या प्रतिक्रियेने चाहत्यांची मनं जिंकली. दुसऱ्या टी-20 मॅच दरम्यान स्टेडियमवरील भारतीय चाहते धोनी-धोनी नावाचा जयघोष करत होते.लक्षात घेण्यासारखे म्हणजे कोहली आणि धोनीमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगले संभंध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये कोहलीने संघाचे कर्णधारपद सांभाळल्यानंतर धोनीने बजावलेल्या मार्गदर्शकाची भूमिकेची कबुली दिली. 2014 धोनीने या खेळाच्या मोठ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर 2019 मध्ये त्याने मर्यादित ओव्हरच्या संघाची सूत्रेही हाती घेतली.

2019 वर्ल्ड कपपर्यंत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यात धोनीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना लंडनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात खेळला ज्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 मध्ये धोनीने प्रतिस्पर्धी पुनरागमन केले. चेन्नई सुपर किंग्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला नसला तरी धोनी आणि त्याचा संघ टी-20 लीगमधील सर्वाधिक चर्चित पैलू ठरला.