IND vs AUS Sydney Test: सिडनी येथे जेव्हा सचिन तेंडुलकरने केला होता धमाल, द्विशतकी खेळीदरम्यान 5 दिवस ऐकले 'हे' एकच गाणे
सचिन तेंडुलकर (Photo Credits: Getty Images)

IND vs AUS Sydney Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 2004 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) दरम्यान सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) सिडनी (Sydney) येथील नाबाद 214 धावांचा शानदार डाव आजही प्रत्येक चाहत्यांच्या आठवणीत राहिला आहे. 2003 मध्ये खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या सचिनने नवीन वर्षाची सुरुवात तिसऱ्या कसोटी दुहेरी शतकासह केली आणि भारताच्या 1-1 अशा मालिका अनिर्णित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. ब्रिस्बेन, अ‍ॅडिलेड आणि मेलबर्नमध्ये सचिनने अनुक्रमे 0, 1, 37, 0 आणि 44 अशा पहिल्या 3 सामन्यांमध्ये फक्त 88 धावा करु शकला होता. आणि फॉर्मात परत येण्यासाठी सचिनकडे फक्त सिडनी कसोटी (Sydney Test) हा एकमेव पर्याय होता. अखेर अपेक्षेप्रमाणे सचिनने सामन्यात आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करत नाबाद 241 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियन ब्रेट ली, शेन वॉर्न यासारख्या दिग्गज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आपल्या खेळी दरम्यान सचिन हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक ब्रायन अ‍ॅडम्सचं Summer of 69 हे गाणं वारंवार ऐकत होता हे स्वतः मास्टर-ब्लास्टरने उघड केलं. (IND vs AUS 2020-21: SCG मध्ये टीम इंडियाचा 'द वॉल' राहुल द्रविडने एक धाव घेताच प्रेक्षकांनी उभं राहून वाजवल्या होत्या टाळ्या, पहा Video)

“मी ऐकलेले गाणे, मी 2004 मध्ये सिडनीमध्ये जेव्हा मी 241 नाबाद 241 धावा केल्या त्या मला आठवतात, तेव्हा पाचही दिवस मी फक्त एक गाणे ऐकले- Bryan Adams’ Summer of 69,” सचिनने एका यूट्यूब वाहिनीवरील प्रश्न/उत्तर सत्रात सांगितले. “मी ते गाणे लूपवर ठेवले. आम्ही ग्राउंडवर प्रवास करत असताना, ड्रेसिंग रूममध्ये, मी फलंदाजीला बाहेर जाण्यापूर्वी, जेवणाची वेळ, चहाची वेळ, सामना संपल्यानंतर हॉटेलवर परत जाताना… पाच दिवस फक्त Summer of 69 होते आणि काहीच नव्हते.” लक्षात घेण्यासारखे म्हणजे, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघातील तो सामना कांगारू संघाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांचा अंतिम सामना होता. आणि सचिनने आपल्या दुहेरी शतकासह भारताला विजय मिळवून देत वॉ यांचे कारकिर्दीतील अंतिम सामना जिंकून देण्याचे स्वप्न भंग केले.

दुसरीकडे, सध्या सुरु असलेली बॉर्डर-गावस्कर मालिका 1-1 अशी बरोबरी आहे, आणि सिडनी येथील सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे, दोन्ही संघासाठी सामना महत्वपूर्ण आहे. 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये सामन्याला सुरुवात होईल.