IND vs AUS CWC 2019 सामना पाहण्यासाठी आलेल्या विजय माल्या विरोधात भारतीय क्रिकेटप्रेमींच्या 'चोर है, चोर है...' च्या घोषणा (Watch Video)
Vijay Mallya (Photo Credits: ANI)

काल (10 जून) लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी कर्जबुडव्या विजय माल्ला याने देखील हजेरी लावली होती. याची माहिती माल्याने ट्विट करुन दिली होती. मात्र सामना संपल्यावर माल्या मैदानाबाहेर पडताना भारतीय क्रिकेट चाहत्यांना 'चोर है, चोर है' च्या घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

भारताच्या विजयावर आनंदी असलेल्या चाहत्यांनी ओव्हल मैदानाबाहेर गर्दी करत 'चोर है, चोर है..' च्या घोषणा दिल्या. यावर घोषणाबाजीवर माल्याने वेगळीच प्रतिक्रीया दिली आहे. आई आणि मुलासह मैदानाबाहेर पडत असताना एएनआयला दिलेल्या प्रतिक्रीयेत माल्या म्हणाला की, "गर्दीत माझ्या आईला इजा पोहचणार नाही याची मी काळजी घेत आहे."

ANI ट्विट:

भारताच्या विजयानंतर माल्याने ट्विट करुन टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या मुलासोबत सामना पाहताना आनंद झाला असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कर्जबुडव्या 'विजय मल्ल्या'ची उघड उपस्थिती)

विजय माल्या ट्विट:

भारतीय बँकांना कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या कर्जबुडव्या विजय माल्या याला भारताच्या स्वाधीन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र याला माल्याच्या वकिलांनी याविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं आहे.