IND vs AUS 4th Test Day 2 Live Streaming: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रलिया (Australia) संघात चौथ्या ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. टीम इंडिया (Team India) गोलंदाजांनी प्रभावी सुरवात करूनही यजमान संघाची धावसंख्या पहिल्या दिवसाखेर तीनशेच्या जवळ पोहचली आहे. आता तिसऱ्या दिवशी संघ आपली आघाडी वाढवण्याच्या प्रयत्नात असतील. गब्बा (Gabba) स्टेडियमवर दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 5:30 वाजता सुरु होईल. भारतीय चाहते ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय, Sony LIV अॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (Mohammed Siraj: सिडनीनंतर ब्रिस्बेनमध्येही ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांकडून मोहम्मद सिराज याला शिवीगाळ)
पहिल्या दिवशी यजमान संघाने मार्नस लाबूशेनचे शानदार शतक आणि स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरुन ग्रीनच्या नाबाद 28 धावा आणि कर्णधार टिम पेनच्या नाबाद 38 धावांच्या जोरावर 274 धावांपर्यंत मजल मारली. लाबूशेनने सर्वाधिक 108 धावांची खेळी करत संघाची स्थिती मजबूत केली. दुसरीकडे, भारतासाठी पहिल्या दिवशी कसोटी पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने 2 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे नटराजनने मार्नस लाबूशेनला मोठी खेळी करू दिली नाही आणि शतक पूर्ण होताच माघारी धाडलं.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया: डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरुन ग्रीन, टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.