भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 4th Test Day 1 Live Streaming: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय (India) संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम टेस्ट सामन्याला 15 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्याने चौथा सामना जिंकणारा संघ मालिकेवर अधिराज्य गाजवेल. गब्बा स्टेडियमवर पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 5:30 वाजता सुरु होईल तर सामन्याच्या अर्धातास पूर्वी म्हणजे सकाळी 5:00 वाजता टॉस होईल. भारतीय चाहते ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) पहिल्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय, Sony LIV अ‍ॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND vs AUS 4th Test 2021: गब्बा मैदानावर चार भारतीय खेळाडूंचा राहीला दबदबा, 'या' टीम इंडिया कर्णधाराने ठोकले सर्वात लोकप्रिय शतक)

पहिल्या अ‍ॅडिलेड सामन्यात ऑस्ट्रलियाने बाजी मारल्यावर टीम इंडियाने मेलबर्न कसोटीत कांगारू संघाचा धुव्वा उडवला आणि सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर सिडनी टेस्टच्या अंतिम दिवशी जिगरबाज खेळी करत सामना अनिर्णीत सोडवला. आणि आता दोन्ही संघाकडे मालिका जिंकण्याची अंतिम संधी आहे, मात्र गब्बा कसोटी सामना देखील अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघानं संयुक्त विजेता घोषित केले जाईल. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, कांगारू संघाने 1988 पासून या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही तर टीम इंडियाने इथे सहा कसोटी सामने खेळले आहेत, ज्यातील पाच गमावले तर एक सामना अनिर्णित राहिला.

असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी संघ

टीम इंडिया: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रिषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, टी नटराजन, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), कुलदीप यादव आणि पृथ्वी शॉ.

ऑस्ट्रेलिया: डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरून ग्रीन, टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवुड, मोइसेस हेनरिक्स, ट्रॅव्हिस हेड, माइकल नेसर, सीन एबॉट, मिचेल स्वीपसन आणि जेम्स पॅटिन्सन.