T Natarajan Test Debut at Gabba: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) ब्रिस्बेन कसोटीत (Brisbane Test) भारतीय (India) क्रिकेट संघाच्या दोन खेळाडूंना दोन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. या दौर्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि टी नटराजन (T Natarajan) तिसरे व चौथे भारतीय क्रिकेटपटू ठरले. यापूर्वी, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजने मेलबर्नमधील बॉक्सिंग डे सामन्यातून टेस्ट डेब्यू केले होते. यापैकी वेगवान गोलंदाज नटराजनचे कसोटी पदार्पण ऐतिहासिक ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त खेळाडूंच्या समस्येला झगडत असलेल्या टीम इंडियाने मागील सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमध्ये चार महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मयंक अग्रवाल आणि शार्दुल ठाकूर यांचं कमबॅक झालं आयेऊ तर नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. लक्षात घेण्यासारखं म्हणजे या दौऱ्यावर नटराजनने तिन्ही स्वरूपात भारताकडून पदार्पण केलं आहे. (IND vs AUS 4th Test 2021: टिम पेनचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, गब्बा टेस्टसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले महत्त्वपूर्ण बदल)
पहिले वनडे नंतर टी-20 आणि आता त्याला कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. आश्चर्यकारक बाब म्हणजे की तीनपैकी कोणत्याही स्वरूपातील दौर्यासाठी त्याची संघात निवड झाली नव्हती. मात्र, अन्य खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्याला ही संधी मिळाली. नटराजन एकाच दौर्यावर तिन्ही स्वरूपात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयांना अशी संधी मिळाली नव्हती. दरम्यान, रविचंद्रन अश्विनच्या दुखापतीमुळे अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.अश्विनने सुंदरला टेस्ट कॅप दिली तर नटराजनला त्याची कसोटी कॅप गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या हातून मिळाली. नटराजन टेट्स डेब्यू करणारा भारताचा 300वा तर सुंदर 301वा खेळाडू ठरला.
Welcome to Test cricket, @Natarajan_91 🤩
Thangarasu Natarajan becomes the first Indian player to make his International debut across all three formats during the same tour 👏#AUSvIND pic.twitter.com/CKltP2uT5w
— ICC (@ICC) January 14, 2021
दुसरीकडे, हे दोन्ही खेळाडू यापूर्वी वनडे आणि टी-20 सामने खेळले आहेत. वॉशिंग्टनने आतापर्यंत देशासाठी एक वनडे आणि 26 टी -20 सामने खेळला आहे, तर टी नटराजनने एक वनडे आणि तीन टी-20 सामने खेळले आहेत. सुंदरला वनडेमध्ये एक विकेट तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 26 सामन्याच्या 25 डावात 29.1 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या आहेत. नटराजनच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने एक वनडे आणि तीन टी-20 सामन्यात सहा विकेट्स घेतल्या आहेत.