IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर भारतीय (India) खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र काही थांबत नाही. एका मागोमाग एक खेळाडू जखमी होत असून आता ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळल्या जाणार्या चौथ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी दरम्यान नवदीप सैनीही ग्रोईंन दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आहे. सैनीनंतर रोहित शर्माही (Rohit Sharma) दुखापतग्रस्त होताना थोडक्यात बचावला. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करीत होतर आणि मार्नस लाबूशेन स्ट्राईकवर होता. त्याच षटकात त्याने बॅकवर्ड शॉर्ट-लेगवर चेंडू खेळत धाव घेण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी चेंडू गेला तिथे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) उभा होता आणि चेंडू त्याच्या दिशेने येताना पाहून पृथ्वी चेंडू घेत लाबूशेनला रनआऊट करण्यासाठी धावला. तो नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने थ्रो करणार होता परंतु त्याने मिडऑनवर उभे असलेल्या रोहित शर्माच्या दिशेने थ्रो केला. दिलासादायक बाब म्हणजे रोहित सतर्क उभा होता आणि चेंडू आपल्याकडे येताना पाहून हाताने रोखला. टीम इंडिया आधीच खेळाडूंच्या दुखापतीशी संघर्ष करत आहे आणि जर पृथ्वीच्या थ्रोमुळे रोहितला दुखापत झाली असेल तर टीम इंडियासाठी हे खूप मोठे नुकसान झाले असते. (Navdeep Saini Injury Update: क्रिकेटर नवदीप सैनीच्या दुखापतीवर बीसीसीआयने दिला अपडेट, गब्बा टेस्टमध्ये मधेच सोडावं लागलं मैदान)
रोहितचे जर लक्ष नसते तर चेंडू रोहितच्या अंगाच्या कुठल्याही भागावर चेंडू लागला असता आणि त्याला गंभीर दुखापत झाली असती. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉच्या चुकीमुळे टीम इंडियाला महागात पडली असती. भारतीय संघातील जखमी खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. नवदीप सैनी सध्या मैदानाबाहेर असून, लवकरच मैदानावर परत येऊन भारतासाठी विकेट घ्यावी अशीच सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे. यापूर्वी, रोहितला आयपीएल दरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती परिणामी त्याला वनडे आणि टी-20 मालिकेला मुकावे लागले. शिवाय, ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्यावर 14 दिवसाच्या क्वारंटाइनमुळे त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन्ही सामन्यातही खेळता आले नाही. सिडनी कसोटीसाठी तो संघात सामील झाला. सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक ठोकले आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, पहा पृथ्वी शॉचा घातक थ्रो:
⚠ Friendly fire ⚠
Live #AUSvIND: https://t.co/IzttOVtrUu pic.twitter.com/8naJ3ykMe7
— cricket.com.au (@cricketcomau) January 15, 2021
पृथ्वीच्या अशा चुकीमुळे त्याच्यावर भन्नाट Memes व्हायरल झाले आहेत. यूजर्स अनेक विनोदी मिम्स शेअर करत पृथ्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतानाही ऑस्ट्रेलियन संघाला मदत करण्याची इच्छा असल्याचे चाहत्यांनी सांगितले. पहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:
ऑस्ट्रेलियासाठी योगदान
Not in playing XI but still contributing for Australia, Prithvi Shaw _/\_ pic.twitter.com/iTTLDEbwag
— R A T N I S H (@LoyalSachinFan) January 15, 2021
शांत हो!
Prithvi Shaw needs to calm a bit. 😂 pic.twitter.com/ikJM1FCCAc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 15, 2021
पृथ्वी झाला ट्रोल
Prithvi shaw throw hits Rohit sharma
Meanwhile everyone pic.twitter.com/Jlwzanz8qX
— Param_Anand07 (@the_aryans119) January 15, 2021
प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्याचा प्रयत्न!
Substitute fielder Prithvi Shaw trying to injure Rohit Sharma to get back into playing XI..😂#AUSvsIND #GabbaTest #INDvsAUS #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/EfPU0x9Lwq
— Chirag Gandhi (@ChiragGandhi_18) January 15, 2021
इंग्लंड दौरा
Prithvi shaw wants to make his place in playing Xi for the England tour 😂😂😂#INDvsAUS #AUSvIND #GabbaTest pic.twitter.com/q3N48nPIOh
— Kiranreddy (@Kiran_reddy_k) January 15, 2021
डोक्याने खेळा!
Throwing ball at rohit body
Prithvi be like - pic.twitter.com/nBAeFqcRdV
— Berozgar umam (@berozgar_umam) January 15, 2021
नवदीप सैनीला दुखापत झाल्यानंतर शॉ पर्यायी फील्डर म्हणून मैदानावर आला. पृथ्वीला कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात स्थान देण्यात आले होते, परंतु खराब फॉर्ममुळे त्याला उर्वरित सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.