Ind Vs Aus 4th ODI 2019: 'टीम इंडिया' ने जिंकला टॉस, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय; Rishabh Pant विकेट कीपर
Ind Vs Aus 4th ODI 2019 (Photo Credits: Twitter/ BCCI)

India Vs Australia Mohali ODI 2019: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा चौथा एकदिवसीय सामना पंजाब येथील मोहालीत (Mohali)  आज रंगणार आहे. पाच सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने दोन तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी आजचा सामना दोन्ही संघासाठी अटीतटीचा आहे. भारतीय क्रिकेट संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यामध्ये एम एस सिंग धोनी (MS Dhoni)  ऐवजी रिषभ पंत (Rishabh Pant)  विकेट किपींग करणार आहे.

सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्ध दोन्ही T20 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता एकदिवसीय सामना मालिका भारत जिकंण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानात उतरणार आहे. २३ मार्च पासून भारतामध्ये आयपीएल आणि जून महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्डकप रंगणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ही मालिका भारतीय क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाची आहे.